शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

CAA : 'राहुल गांधी फक्त मूर्ख नाहीत तर महामूर्ख आहेत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 16:17 IST

Citizen Amendment Act : 'राहुल गांधी फक्त मूर्ख नाहीत तर महामूर्ख आहेत' असं नायब सिंह सैनी यांनी केला आहे.

नवी दिल्ली - हरयाणामधील कुरुक्षेत्र येथील भाजपा खासदार तसेच माजी मंत्री नायब सिंह सैनी यांनी राहुल गांधींवर टीका करताना एक वादग्रस्त विधान केलं आहे. 'राहुल गांधी फक्त मूर्ख नाहीत तर महामूर्ख आहेत' असं नायब सिंह सैनी यांनी म्हटलं आहे. तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दलकाँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना काहीही माहिती नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

नायब सिंह सैनी यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख महामूर्ख असा केला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे कोणत्याही नागरिकाचं नागरिकत्व काढून घेण्यात येणार नाही ही गोष्ट राहुल गांधी यांना माहिती नसल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. 'राहुल गांधी फक्त मूर्ख नाहीत तर महामूर्ख आहेत. सीएए हे नेमकं काय आहे आणि कशासाठी आहे हेच त्यांना माहीत नाही' असं सैनी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

काँग्रेस नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल लोकांमध्ये गैरसमज पसरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच सरकारला घेरण्यासाठी त्यांच्याकडे कोणताच मुद्दा नसल्याने कायद्यासंबंधी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचं देखील म्हटलं आहे. काँग्रेस पक्षाच्या स्थापनादिनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या (एनआरसी) विरोधात देशभर विरोध प्रदर्शन करण्यात आले होते. त्यावेळी राहुल गांधी यांनी गुवाहाटीमध्ये आयोजित कार्यक्रमात मोदी सरकार आणि आरएसएसवर हल्लाबोल केला होता. 

"आम्ही भाजपा आणि आरएसएसला आसामची भाषा, इतिहास आणि संस्कृतीवर आक्रमण करू देणार नाही. आसामला नागपूर आणि आरएसएसचे चड्डीवाले चालवू शकत नाहीत, तर आसामची जनताच चालविणार आहे", असं सांगत राहुल गांधी यांनी आरएसएसवर निशाणा साधला होता. याचबरोबर, राहुल गांधी यांनी सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यांवरून नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य केले. आसामच्या जनतेला लढवायचे... भारतातील जनतेला लढवायचे... ज्या ठिकाणी जातील, त्याठिकाणी फक्त द्वेष पसरवत आहेत. मात्र, आसामची जनता द्वेषाने किंवा रागाने पुढे जाणार नाही. तर प्रेमाने पुढे जाणारी आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते.     

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाHaryanaहरयाणाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक