शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुतोंडी - राहूल गांधींचा गौरी लंकेश हत्याप्रकरणी हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 11:41 IST

गौरी लंकेश या पत्रकाराती बेंगळूरमध्ये झालेली हत्या दुर्दैवी असून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी थेट पंतप्रधानांना लक्ष्य केले आहे. विरोधी विचारसरणीला बळाने दाबून टाकण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप राहूल यांनी केला आहे

नवी दिल्ली, दि. 6 - गौरी लंकेश या पत्रकाराती बेंगळूरमध्ये झालेली हत्या दुर्दैवी असून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी थेट पंतप्रधानांना लक्ष्य केले आहे. विरोधी विचारसरणीला बळाने दाबून टाकण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप राहूल यांनी केला आहे. लंकेश यांची हत्या संघाशी संबंधित लोकांनी केली असल्याचे सूचक उद्गार काढत राहूल गांधी यांनी नरेंद्र मोदी हिंदुत्ववादी विचारांचे पंतप्रधान असल्याचा उल्लेख केला.तसेच, नरेंद्र मोदी जेव्हा बोलतात तेव्हा त्याचे दोन अर्थ निघतात. एक अर्थ त्यांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी असतो तर एक अर्थ तमाम दुनियेसाठी असतो असे सांगत मोदी हिंदुत्ववादी विचारांना बळ देत असल्याची टीका गांधी यांनी केली आहे.विरोधी विचारांचे आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न होत असल्याचे गांधी म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख करत राहूल गांधी यांनी लंकेश यांची हत्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या समाजकंटकांनी केली असावी असे सुचवले आहे. आपण कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी बोललो असून, लंकेश यांची हत्या करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, त्यांना पकडण्यात येईल असे गांधी म्हणाले. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आहे.

काल मंगळवारी राहत्या घरी झाली लंकेश यांची हत्या

देशातील आघाडीच्या पत्रकारांपैकी एक असलेल्या गौरी लंकेश यांची बंगळुरूमधील राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. रात्री आठ सव्वाआठच्या सुमारास तीन ते चार हल्लेखोरांनी गौरी यांच्या घरात घुसले आणि त्यांनी जवळून गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. त्यांच्यावर हा हल्ला का करण्यात आला. तसेच त्यांच्यावर हल्ला करणारे कोण होते. याबाबत काहीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. 55 वर्षीय गौरी लंकेश या साप्ताहिक लंकेश पत्रिकाच्या संपादक होत्या. तसेच त्या विविध वर्तमानपत्रांमध्ये लिखाण करायच्या. त्यांनी उजव्या विचारसरणीच्या प्रवृत्तीवर सातत्याने टीका केली होती.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसMurderखून