काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियाणातील मतदारांच्या यादीतून २५ लाख मते चोरीला गेल्याचा गंभीर आरोप केला. यावेळी त्यांनी मतदारांच्या यादीत कथित गैरप्रकार दाखवण्यासाठी एका महिलेचा फोटो 'सीमा', 'स्वीटी' आणि 'सरस्वती' यांसारख्या नावांनी २२ वेळा वापरला गेल्याचा दावा केला. मात्र, आता या फोटो प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे. हा फोटो ब्राझिलियन मॉडेलचा असल्याचा दावा करण्यात आला. पंरतु, लॅरिसा नेरी नावाच्या एका महिलेने पुढे सांगितले की, हा फोटो तिचा आहे.
लॅरिसा नेरीने तिच्या सोशल मिडिया हँडलवरून राहुल गांधींच्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली. पोर्तुगीज भाषेत बोलताना तिने कथित मतदान घोटाळ्यात तिच्या नावाचा गैरवापर झाल्याच्या वृत्तांवर आश्चर्य व्यक्त केले. "मित्रांनो, ते माझा जुना फोटो वापरत आहेत. या फोटोमध्ये माझे वय कमी दिसत आहे. जवळपास २० वर्षांची, कदाचित १८... भारतात, ते इतरांना फसवण्यासाठी माझ्या फोटोचा गैरवापर केला जात आहे, असेही तिने सांगितले. हा व्हिडिओ एआयच्या मदतीने भाषांतरीत करण्यात आला आहे.
राहुल गांधींच्या आरोपानंतर भारतीय पत्रकारांनी तिच्याशी संपर्क साधायला सुरुवात केली, असेही लॅरिसा नेरीने सांगितले. ती म्हणाली की, "एका पत्रकाराने ती जिथे काम करते त्या सलूनशीही संपर्क साधला. एका पत्रकाराने मला संपूर्ण गोष्टीबद्दल आणि माझ्या कामाबद्दल जाणून घेण्यासाठी फोन केला. त्यांना माझी मुलाखत घ्यायची होती. पण मी दुर्लक्ष केले. त्यानंतर त्याने मला इंस्टाग्रामवर कॉल केला."
राहुल गांधींचा 'मतचोरी'चा आरोप कायम
दरम्यान, राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत हरियाणाच्या २ कोटी मतदारांपैकी २५ लाख मते चोरीला गेल्याचा दावा करत, लोकशाहीत मतचोरी होत असल्याचे म्हटले. या आरोपांना ठोस पुरावा म्हणून त्यांनी मतदार यादीतील एकाच फोटोचा वारंवार वापर झाल्याचे उदाहरण दिले. मात्र, आता ज्या फोटोच्या आधारे हा आरोप करण्यात आला, त्या फोटोवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
Web Summary : Rahul Gandhi alleged voter list fraud in Haryana, citing a repeatedly used photo. The woman in the photo, Larissa Neri, clarified it's an old picture of her, not a Brazilian model. She expressed surprise at its misuse.
Web Summary : राहुल गांधी ने हरियाणा में मतदाता सूची में धोखाधड़ी का आरोप लगाया, जिसमें बार-बार इस्तेमाल की गई तस्वीर का हवाला दिया गया। तस्वीर में महिला, लारिसा नेरी ने स्पष्ट किया कि यह उसकी पुरानी तस्वीर है, ब्राजीलियाई मॉडल नहीं। उन्होंने इसके दुरुपयोग पर आश्चर्य व्यक्त किया।