शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

...असा कारनामा करणारे मोदी पहिलेच पंतप्रधान; राहुल गांधींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 19:23 IST

मोदींच्या सिंगापूर दौऱ्यातील मुलाखतीवर राहुल गांधींचं मिश्किल भाष्य

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वत्कृत्वावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी निशाणा साधला आहे. सिंगापूरच्या नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठातील मोदींची मुलाखत स्क्रिप्टेड होती, असा टोला राहुल गांधींनी लगावला आहे. 1 जून रोजी सिंगापूरमध्ये मोदींची मुलाखत झाली. यावेळी उपस्थितांना थेट प्रश्न विचारले होते. मोदींच्या सिंगापूर दौऱ्यातील मुलाखतीवर राहुल गांधींनी जोरदार निशाणा साधला आहे. 'लोकांनी उत्स्फूर्तपणे विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देणारे मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान आहेत. विशेष म्हणजे मोदी काय उत्तरं देणार, हे त्यांच्या दुभाषकाला आधीच माहित होतं,' असा चिमटा राहुल यांनी काढला. 'बरं झालं, मोदींना खरंच लोकांनी थेट उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली नाहीत, अन्यथा मोदींसमोर पेचप्रसंग निर्माण झाला असता,' असं राहुल यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. 'मोदी देशाचे पहिले असे पंतप्रधान आहेत, ज्यांनी लोकांच्या उत्स्फूर्त प्रश्नांना उत्तरं दिली आणि ती उत्तरं त्यांच्या दुभाषकाला (ट्रान्सलेटरला) माहित होती. ते खरोखरच लोकांच्या उत्स्फूर्त प्रश्नांना सामोरे गेले नाहीत, हे खूप बरं झालं. नाहीतर ती आपल्या सर्वांसाठीच मोठी नामुष्की ठरली असती,' असं ट्विट करत राहुल गांधींनी त्यासोबत सिंगापूरमधील मुलाखतीच्या कार्यक्रमाचा एक व्हिडीओदेखील जोडला आहे. 

मोदींच्या वत्कृत्वाची अनेकदा प्रशंसा केली जाते. मात्र मोदींच्या सिंगापूरमधील मुलाखतीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. उपस्थितांनी मोदींना उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारायचे आणि मोदींनी त्या प्रश्नांना उत्तरं द्यायची, असं या मुलाखतीचं स्वरुप होतं. यावेळी मोदींना आशिया खंडासमोरच्या आव्हानांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी मोदींनी उत्तर दिल्यावर त्याचं इंग्रजीत भाषांतर होणं अपेक्षित होतं. मात्र मोदींच्या दुभाषकानं सांगितलेली काही माहिती आणि आकडेवारी ही मोदींच्या उत्तरातच नव्हती. त्यामुळे हा संपूर्ण कार्यक्रम स्क्रिप्टेड होता की काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस