शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

भ्रष्टाचारातील आरोपीकडून राहुल गांधींना 62 लाखांची भेट; भाजपचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 17:15 IST

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सध्या कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. येथे भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट टक्कर आहे.

बंगळुरु - कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सध्या कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. येथे भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट टक्कर आहे. काँग्रेस आपली गादी राखण्याचा प्रयत्न करत असून भाजपा कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी प्रयत्नशील असेल. दोन दिवसांपासून राहुल गांधी कर्नाटकाच्या दौऱ्यावर आहेत. 

कर्नाटकमध्ये दोन्ही पक्षामध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपानं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर घणाघाती टिका केली आहे.  खाण घोटाळ्यात आरोपी असेल्या आमदारानं राहुल गांधीना 62 लाख रुपयांची प्रतिमा दिल्याचा आरोप भाजपानं केला आहे.  माध्यमांच्या वृत्तानुसार, कर्नाटकाचे आमदार बी. नागेंद्र यांनी आता काँग्रेसचे सदस्यत्व घेतले आहे. नागेंद्र यांनी राहुल गांधी यांना सुवर्ण जडीत चांदीची एक प्रतिमा गिफ्ट दिली. त्या प्रतिमेची किंमत 62 लाख असेल्याचा आरोप भाजपानं केला आहे. नागेंद्र यांचं नाव कर्नाटकाच्या कोळसा घोटाळ्यामध्ये आलेलं आहे. 

काँग्रेस अध्यक्ष भ्रष्टाचारात आरोपी असेल्या आमदाराकडून गिफ्ट घेत आहेत आणि पंतप्रधान यांच्यावर राफेलमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप करतायत अशी टिका भाजपाकडून केली जात आहे. राहुल गांधींना आता भ्रष्टाचारावर बोलण्याचा काही आधिकार नाही. कर्नाटकाचे भाजपा अध्यक्ष बी.एस. येदुरप्पा यांनी ट्विट करत राहुल गांधीवर निशाना साधला आहे. 

 

यापूर्वी राहुल गांधी यांनी घातलेल्या महागड्या जॅकेटवरुन भाजपानं त्यांना घेरलं होतं. मेघालय निवडणुकीपूर्वी मंगळवारी (30 जानेवारी) काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी शिलाँग येथे दाखल झाले होते. यावेळी तब्बल 70 हजार रुपयांच्या किंमतीचं जॅकेट परिधान करुन राहुल गांधी पार्टीच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. गेल्या वर्षी उत्तराखंडातील निवडणूक प्रचारादरम्यान एक सभेमध्ये कुर्त्यांचा फाटलेले खिसा दाखवणा-या राहुल गांधी यांनी आता एवढं महागडं जॅकेट घातल्यानं भाजपानं त्यांच्यावर चौफेर टीकास्त्र सोडले होतं.  महागड्या जॅकेटवरुन भाजपानं राहुल गांधींवर ट्विटरवरुन निशाणा साधला आहे.  'राहुल यांचं सुटा-बुटातील मेघालय सरकार भ्रष्टाचाराच्या आहारी गेले आहे. आमच्याकडे उत्तर मागण्याऐवजी काँग्रेस सरकारनं स्वतःचं रिपोर्ट कार्ड दिलं पाहिजे', असे ट्विट भाजपानं  केले आहे होतं. 

भाजपाकडून सत्याची अपेक्षा ठेवणे चुकीचेच, कर्नाटकात राहुल गांधी यांची टीका

भाजपा हा खोटे बोलणा-या मंडळींचा पक्ष असून, त्यांच्याकडून तुम्ही सत्याची अपेक्षा ठेवूच शकत नाही, तरुणांना रोजगार, शेतक-यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव, काळ्या पैशाला आळा, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये अशी सारीच भाजपा व नरेंद्र मोदी यांची आश्वासने खोटी ठरली आहेत, अशी टीका करीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील निवडणूक प्रचारात केली.कर्नाटकातील निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नसल्या, तरी तिथे काँग्रेस व भाजपा दोघांनीही प्रचार सुरू केला आहे. गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेऊ न कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर टीका केली होती. त्याचा थेट उल्लेख न करताच, सिद्धरामय्या सरकारने राबवलेल्या अनेक विकास कामे व योजनांविषयी बोलताना राहुल गांधी यांनी भाजपाने दिलेली आश्वासने कशी खोटी ठरली, हे नमूद केले. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा