शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
5
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
6
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
8
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
9
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
10
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
11
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
12
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
13
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
14
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
15
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
16
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
17
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
18
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
19
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
20
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ

Rahul Gandhi; ७२ वर्षे जुना कायदा, लिली थॉमस केसवरील निर्णय, अशी गेली राहुल गांधींची खासदारकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 17:27 IST

Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी आता लोकसभा सदस्य राहिलेले नाहीत. मानहानीच्या खटल्यात कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच लोकसभेतील सदस्यत्वही रद्द झालं आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचं नोटिफिकेशन प्रसिद्ध झालं आहे. 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आता लोकसभा सदस्य राहिलेले नाहीत. मानहानीच्या खटल्यात कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच लोकसभेतील सदस्यत्वही रद्द झालं आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचं नोटिफिकेशन प्रसिद्ध झालं आहे. काल सूरतमधील एका कोर्टाने राहुल गांधी यांना मानहानीच्या चार वर्षे जुन्या खटल्यात दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. त्यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांच्या खासदारकीवरही संकट निर्माण झाले होते. 

आज लोकसभा सचिवालयाने नोटिफिकेशन प्रसिद्ध करत त्यांची खासदारकी रद्द झाल्याचे जाहीर केले. घटनेतील कलम १०२(१)(ई) आणि लोकप्रतिनिधित्व कायद्यांतर्गत त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे, असे यात म्हटले आहे. राहुल गांधी २०१९ मध्ये वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी अमेठी मतदारसंघातूनही निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. 

काय सांगतो लोकप्रतिनिधित्व कायदा? - १९५१ मध्ये लोकप्रतिनिधित्व कायदा लागू झाला होता. या कायद्यातील कलम ८ मध्ये लिहिले आहे की, जर कुठलाही खासदार किंवा आमदाराला दोषी ठरून शिक्षा झाली, तर त्याला ज्या दिवशी त्याला दोषी ठरवतील त्या दिवसापासून पुढच्या सहा वर्षांपर्यंत त्याला निवडणूक लढवता येणार नाही. - कलम ८(१) मध्ये ज्याअंतर्गत दोषी ठरवल्यावर निवडणूक लढवता येणार नाही, अशा गुन्ह्यांचा उल्लेख आहे. त्यामध्ये दोन समुदायांमध्ये द्वेष निर्माण करणे, भ्रष्टाचार, बलात्कार यासारख्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरवल्यास निवडणूक लढवता येत नाही. मात्र यामध्ये मानहानीचा उल्लेख नाही आहे. - गतवर्षी समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांची आमदारकी रद्द झाली होती. कारण त्यांना हेट स्पीच प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं.- या कायद्याच्या कलम ८(३)मध्ये लिहिलं आहे की, जर कुठल्याही खासदार किंवा आमदाराला दोन वर्षांची शिक्षा झाली तर त्यांचं सदस्यत्व तत्काळ रद्द होते. तसेच पुढच्या सहा वर्षांपर्यंत निवडणूक लढवण्यावर बंदी येते. 

लिली थॉमस - २००५  मध्ये केरळमधील वकील लिली थॉमस आणि लोकप्रहरी नावाच्या एका एनजीओचे सरचिटणीस एस.एन. शुक्ला यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. - या याचिकेमध्ये लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम ८(४)ला बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यांनी दावा केला की, हे कलम दोषी खासदार-आमदारांचं सदस्यत्व वाचवतं. कारण याअंतर्गत जर वरील कोर्टामध्ये प्रकरण प्रलंबित असल्यास त्यांना अयोग्य घोषित करता येत नाही. - या याचिकेमध्ये त्यांनी घटनेतील कलम १०२(१) आणि १९१ (१) चाही हवाला देण्यात आला होता. कलम १०२(१) मध्ये खासदार आणि १९१(१) मध्ये विधानसभा आणि विधानपरिषदेला अपात्र ठरवण्याची तरतूद आहे. - १० जुलै २०१० रोजी सुप्रीम कोर्टातील जस्टिस ए.के. पटनायक आणि जस्टिस एस.जे मुखोपाध्याध्याय यांच्या बेंचने याबाबत निर्णय दिला. कोर यांनी सांगितले की, केंद्राजवळ कलम ८ (४) ला लागू करण्याचा अधिकार नाही आहे. - सुप्रीम कोर्टाने सांगितले की, जर कुठल्याही सध्याचा खासदार किंवा आमदाराला दोषी ठरवलं गेलं तर लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम ८(१), ८(२) आणि ८(३) अंतर्गत आणि ८(३) अंतर्गत त्याला अयोग्य ठरवण्यात येईल.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभा