प्रशासनाच्या दुर्लक्षाने साधुग्राममधून निघून जाणार रघुवीरनगर खालसा महामंडलेश्वर मनोहरदास महाराजांची तीव्र नाराजी
By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:09+5:302015-08-18T21:37:09+5:30
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात प्रमुख आखाड्यांचा ध्वजारोहणाची जय्यत तयारी एकीकडे सुरू असतानाचा साधुग्राममध्ये गेल्या महिनाभरापासून दाखल झालेले रघुवीरनगर खालसा मात्र प्रशासकीय यंत्रणेवर वारंवार सुविधांची मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ठेवत साधुग्राम सोडण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती या खालशाचे महंत महामंडलेश्वर मनोहरदास महाराज यांनी दिली.

प्रशासनाच्या दुर्लक्षाने साधुग्राममधून निघून जाणार रघुवीरनगर खालसा महामंडलेश्वर मनोहरदास महाराजांची तीव्र नाराजी
न शिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात प्रमुख आखाड्यांचा ध्वजारोहणाची जय्यत तयारी एकीकडे सुरू असतानाचा साधुग्राममध्ये गेल्या महिनाभरापासून दाखल झालेले रघुवीरनगर खालसा मात्र प्रशासकीय यंत्रणेवर वारंवार सुविधांची मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ठेवत साधुग्राम सोडण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती या खालशाचे महंत महामंडलेश्वर मनोहरदास महाराज यांनी दिली.औरंगाबादरोड संत जनार्दन स्वामी आश्रमाच्या बाजूला रायपूर येथील अखिल भारतीय वेद, वेदांग ज्योतिष स्वाध्याय शोध संस्थानाचे महामंडलेश्वर मनोहरदास महाराज यांचा रघुवीरदास खालसा असून, सेक्टर-२ ए मधील या खालशाला लक्ष्मी लॉन्सच्या मागील बाजूला जागा मिळाली आहे. याठिकाणी अनेक गैरसोयी असल्याचे सांगत मनोहरदास यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. तसेच या भागात पाण्याची व्यवस्था नाही, सुरक्षेची व्यवस्था नसल्याने चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. रस्ते खराब असल्याने भाविकांना या भागात येण्यासाठी गैरसोय होत आहे. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष झाल्याने आपण नाशिकमधून गोदावरीचे जल आणि येथील माती घेऊन शाहीस्नानापूर्वीच निघून जात असल्याचेही महाराजांनी सांगितले.