रघुराम राजन भेटले पंतप्रधानांना
By Admin | Updated: June 2, 2014 05:48 IST2014-06-02T05:48:23+5:302014-06-02T05:48:23+5:30
नरेन्द्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर डॉ. राजन यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले आहे

रघुराम राजन भेटले पंतप्रधानांना
नवी दिल्ली : देशातील अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि त्या अनुषंगाने भारतीय रिझर्व्ह बँक उचलत असलेली पावले या संदर्भात माहिती देण्यासाठी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. नरेन्द्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर डॉ. राजन यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले आहे. मात्र, ३ जून रोजी रिझर्व्ह बँकेतर्फे मांडल्या जाणार्या पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक परिस्थितीचा आढावा राजन यांनी सादर केल्याचे वृत्त आहे. अन्न धान्याची महागाई, वित्तीय तूट या दोन प्रमुख मुद्यांसदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. गेल्याच आठवड्यात राजन यांनी केंद्रीय वित्तमंत्री अरूण जेटली यांचीही भेट घेत अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांसंदर्भात माहिती दिली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)