शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

Rafale Deal: राहुल गांधी साधणार HALच्या कर्मचाऱ्यांशी संवाद; जाणून घेणार राफेल करारानंतरचे 'हाल'हवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 5:20 PM

राफेल मुद्यावरुन पुन्हा एकदा साधणार मोदींवर निशाणा

नवी दिल्ली: राफेल डील वरुन सर्वोच्च न्यायालयानं मोदी सरकारला झटका दिला आहे. राफेल विमान खरेदीच्या प्रक्रियेची माहिती देण्याचे आदेश न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. न्यायालयाच्या या धक्क्यानंतर काँग्रेसनं राफेल मुद्यावरुन सरकारची आणखी कोंडी करण्याची योजना आखली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. राफेल करारात अंबानीच्या कंपनीला सामावून घेत मोदींनी हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीवर अन्याय केला, अशी टीका राहुल यांनी वारंवार केली आहे. 13 ऑक्टोबरला राहुल गांधी कर्नाटकच्या बंगळुरुमध्ये कँडल मार्च काढणार आहेत. काँग्रेस कार्यालयापासून सुरू होणारा हा मोर्चा हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेडच्या कार्यालयाजवळ संपेल. यानंतर राहुल गांधी हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधतील. काँग्रेस नेते जयपाल रेड्डी यांनी या मोर्चाबद्दलची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. 'राफेल कराराचा सर्वाधिक फटका हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेडला बसला आहे. याठिकाणी 30 हजार कर्मचारी आहेत. राफेल करारानंतर यातील 10 हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येईल,' असं रेड्डी यांनी सांगितलं. राहुल गांधी 13 ऑक्टोबरला हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. राफेल करारावरुन मोदींवर निशाणा साधताना राहुल यांनी अनेकदा हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेडचा उल्लेख केला आहे. फ्रान्सच्या डॅसो कंपनीनं राफेल विमानांच्या निर्मितीसाठी अनिल अंबानीच्या रिलायन्स डिफेन्सशी करार केला. हा करार करुन मोदींनी हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेडच्या तोंडचा घास हिरावला, असा आरोप राहुल यांनी अनेकदा केला आहे. 

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीAnil Ambaniअनिल अंबानी