शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Rafale Deal : राहुल गांधी पाकिस्तानची मदत करू इच्छित आहेत - रविशंकर प्रसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 17:40 IST

गांधी कुटुंबच भ्रष्टाचाराचे जनक असून राहुल गांधी यांनी देशाच्या सुरक्षेशी आणखी खेळू नये, असे आवाहन केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले.

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे बिनबुडाचे आरोप करत असून त्यांच्याच सरकारच्या काळात रिलायन्सशी प्राथमिक स्वरुपाचा करार करण्यात आला होता. गांधी कुटुंबच भ्रष्टाचाराचे जनक असून राहुल गांधी यांनी देशाच्या सुरक्षेशी आणखी खेळू नये, असे आवाहन केंद्रीय मंत्री  रविशंकर प्रसाद यांनी केले. तसेच राहुल गांधी राफेल कराराची माहिती जगजाहीर करून पाकिस्तानची मदत करू इच्छित आहेत, असा गंभीर आरोपही प्रसाद यांनी केला.

राहुल गांधी यांनी आज दुपारी केलेल्या आरोपांवर भाजपकडून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी 2012 मध्ये रिलायन्स आणि डसॉल्टच्या काराराबाबत छापून आलेले वृत्तही दाखविले. ते म्हणाले की, 2001 ला नव्या विमानांबाबत सांगितले गेले. 28 ऑगस्ट 2007 ला डसॉल्ट एव्हीएशन आणि आणखी एका कंपनीने निविदा भरल्या. जानेवारी 2012 मध्ये 8 वर्षांनंतर डसॉल्टला निवडले. सहा महिन्यांनी या कराराला पुन्हा परिक्षण करण्यास सांगितले. हवाई दल सारखे सांगत होते, विमाने मिळायला हवीत. याचे राहुल गांधी यांनी उत्तर द्यावे. 2012 मध्येच रिलायन्सशी एमओयू झाला होता. तेव्हा रिलायन्सशी चर्चा झाली होती. तेव्हा आमचे सरकार नव्हते. राहुल गांधी यांच्याच सरकारच्या काळात हा करार झाला. याबाबतची वृत्तेही छापून आली होती. आता राहूल गांधी यावर आवाज उठवत आहेत. अंबानी परिवारामध्ये झालेल्या फाटाफुटीशी आपल्याला काहीही देणेघेणे नाही, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. 

शस्त्रास्त्रांशिवाय लढाऊ विमानाचा उपयोग काय?10 एप्रिल 2015 ते 2016 दरम्यान हवाई दलाच्या चिंतेला पाहून हा राफेल करार करण्यात आला. 36 हा आकडा कशासाठी? तर बाकीची विमाने देशातच बनतील. वायुदलाला तात्काळ विमाने मिळतील. विमान दिल्ली ते मुंबई जाईल. परंतू हे विमान फिरण्यासाठी नाही, तर युद्धासाठी आहे. यामुळे या विमानावर शस्त्रास्त्रे लावली जातील. त्याला खर्च येणार आहे. युपीए सरकारने करार केलेल्या शस्त्रास्त्रांशिवाय विमानांपेक्षा 9 टक्क्यांनी कमी किंमत तर शस्त्रांसह विमानाची 20 टक्के किंमत ठरविण्यात आली आहे. राहुल गांधी यांना शिकविण्याची गरज आहे. कारण त्यांच्या पक्षातील लोक त्यांना शिकवत नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

 

राहुल गांधी यांनी आधी एकच किंमत ठरवावीराहुल गांधी ज्या किंमतीचा उल्लेख केला आहे. त्या किंमती आजपर्यंत पाहिलेल्या नाहीत. खेळण्यातले विमान खरेदी करत नाही आहोत. राहुल हे त्यांच्या सरकारने पाचशे ते 700 कोटी किंमत ठरविल्याचे सांगत आहेत. हे आकडे वेगवेगळे आहेत. यामुळे त्यांनी आधी अभ्यास करावा, असा टोलाही प्रसाद यांनी लगावला. राफेलबाबत माहिती देऊ शकत नाही, कारण चीन आणि पाकिस्तानला याची माहिती मिळेल.

रिलायन्सला फ्रान्सच्या कंपनीने निवडलेकरार सरकारने केला. परंतू, भारतात त्यांचा कोण सहकारी असावा हे फ्रान्सच्या कंपनीनेच ठरविलेले आहे. यासंबंधीचे वक्तव्य फ्रान्स सरकारने आणि डसॉल्ट कंपनीनेही केले आहे. यामुळे मोदी किंवा भारत सरकारचा याच्याशी संबंध कसा येऊ शकतो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

रिलायन्सच नाही अन्य सहा कंपन्या करारातदेशातील केवळ रिलायन्सच नाही, तर महिंद्रासह सहा कंपन्यांशी करार झाले आहेत. विमानासाठी लागणारे सुटे भाग याच कंपन्या बनविणार आहेत. याचबरोबर अन्य 100 कंपन्यांशीही बोलणी सुरु आहेत. राहुल गांधी यांना रोजगार उपलब्ध झालेले नको आहेत का? असाही सवाल त्यांनी केला.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलRahul Gandhiराहुल गांधीFranceफ्रान्सBJPभाजपाcongressकाँग्रेस