शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

राफेलचा सौदा नऊ टक्के स्वस्त- संरक्षणमंत्री सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 12:54 AM

विमानांच्या खरेदी व्यवहारातील सत्य दडपण्यात येत असल्याचा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अ‍ॅन्टोनी यांनी केलेला आरोप त्यांनी फेटाळून लावला.

नवी दिल्ली : एनडीए सरकारला राफेल विमाने यूपीए सरकारच्या काळात झालेल्या करारापेक्षा ९ टक्के स्वस्त दराने मिळाली आहेत असे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सांगितले. या विमानांच्या खरेदी व्यवहारातील सत्य दडपण्यात येत असल्याचा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अ‍ॅन्टोनी यांनी केलेला आरोप त्यांनी फेटाळून लावला.राफेल करारातून हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी बाहेर जाण्यास यूपीए सरकारच जबाबदार आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, एचएएल व राफेल विमानांची कंपनी डेसॉल्ट एव्हिएशन यांच्यामध्ये निर्मितीविषयक नियमांबाबत सहमती झाली नव्हती. या घडामोडी यूपीए सरकारच्या काळातच घडल्या आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत चांगली लढत होऊन भाजपाच विजयी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.याचिकेची सुनावणी १० आॅक्टोबरलाराफेल विमान खरेदी व्यवहाराला स्थगिती द्यावी अशी विनंती करणाऱ्या जनहित याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने १० आॅक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. अ‍ॅड. एम. एल. शर्मा यांनी ही याचिका दाखल केली आहे. राफेल प्रकरणी अजून काही कागदपत्रे सादर करावयाची असल्याने या याचिकेची सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती शर्मा यांनी न्यायालयाला केली होती.जेपीसी नेमण्यास चालढकल का? : अ‍ॅन्टोनीराफेल विमानांच्या खरेदी व्यवहाराच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती नेमण्यास केंद्र सरकार चालढकल का करीत आहे असा सवालही त्यांनी विचारला. हा करार करताना देशाच्या सुरक्षेशी तडजोड केल्याने केंद्र सरकारला आता अपराधी वाटत आहे, असेही ते मंगळवारी एका पत्रकार परिषदेत म्हणाले.२०१३ साली राफेल विमानांच्या किंमत निश्चितीसाठी नेमलेली समिती कराराला अंतिम रुप देण्याच्या बेतात असताना तत्कालीन संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅन्टोनी यांनी समितीच्या कामकाजात केल्याचा आरोप सीतारामन यांनी केला होता. त्याचा अ‍ॅन्टोनी यांनी ठाम शब्दांत इन्कार केला. १२६ ऐवजी फक्त ३६ राफेल विमानेच का खरेदी करण्यात येत आहेत असे प्रश्नही त्यांनी विचारला.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनRafale Dealराफेल डील