शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

राफेल : सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका; सरकारकडून खोटी माहिती दिल्याचा शौरी, भूषण, सिन्हा यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 04:55 IST

राफेल व्यवहारामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या सर्व जनहित याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावल्या होत्या.

नवी दिल्ली : ३६ राफेल विमानांच्या खरेदी व्यवहारामध्ये कोणताही घोटाळा न झाल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला क्लीन चिट दिली होती. पण १४ डिसेंबर रोजी दिलेल्या निकालाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती करणारी एक याचिका माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी तसेच अ‍ॅड. प्रशांत भूषण यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.राफेल व्यवहारामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या सर्व जनहित याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावल्या होत्या. राफेल विमानांची खरेदी देशासाठी आवश्यक असल्याचे न्यायालयाने या निकालात म्हटले आहे. राफेलच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला अडचणीत आणण्यासाठी काँग्रेससह काही विरोधी पक्ष सरसावले होते. आगामी लोकसभा निवडणुकीत तो प्रचारातील मुख्य मुद्दा बनविण्याचाही या पक्षांचा विचार होता. मात्र, या निकालामुळे या पक्षांची मोठी राजकीय अडचण झाली. सिन्हा, शौरी, भूषण यांनी केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, राफेलच्या खरेदीत अनेक उणिवा आहेत. केंद्र सरकारने न्यायालयाला चुकीची माहिती दिली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करायला हवा. या याचिकेची खुली सुनावणी व्हावी, असेही या तिघांनी म्हटले आहे.मोदी यांच्यावर आरोपकाँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, राफेल व्यवहार करताना अनेक नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. त्यांची नोंद ज्या फायलींमध्ये आहे त्या माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या ताब्यात आहेत. या फायली लपवून का ठेवण्यात येत आहेत, असाही सवाल त्यांनी केला.राफेलप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच थेट आरोप झाले आहेत. मात्र, त्याचा इन्कार मंगळवारी दिलेल्या मुलाखतीत करून मोदी पुन्हा एकदा खोटे बोलले आहेत.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलCourtन्यायालय