पंचवीस वर्षात शहराचा विकास झाला नाही राधाकृष्ण विखे पाटील: श्री छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

By Admin | Updated: August 19, 2015 22:27 IST2015-08-19T22:27:36+5:302015-08-19T22:27:36+5:30

अहमदनगर: गत पंचवीस वर्षात शहराचा विकास न झाल्याने शहर विकासापासून पन्नास वर्षे मागे गेले आहे. पंचवीस वर्षे शहराचे लोकप्रतिनिधीत्व करणार्‍यांना शहर विकास करण्याची इच्छाशक्तीच नसल्याची टीका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. नगरकरांना पंचवीस वर्षात आमदार निधी कसा अन् काय असतो हे कळाले नाही. शहरातील नागरिकांनी लोकप्रतिनिधी बदलल्यानंतर त्यांना आमदार निधी कळाला असल्याचे सांगत त्यांनी आमदार जगताप यांच्या कार्याचे कौतुक केले.

Radhakrishna Vikhe-Patil: The launch of Shri Chhatrapati Sambhaji Maharaj Garden in the twenty-fifth year | पंचवीस वर्षात शहराचा विकास झाला नाही राधाकृष्ण विखे पाटील: श्री छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

पंचवीस वर्षात शहराचा विकास झाला नाही राधाकृष्ण विखे पाटील: श्री छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

मदनगर: गत पंचवीस वर्षात शहराचा विकास न झाल्याने शहर विकासापासून पन्नास वर्षे मागे गेले आहे. पंचवीस वर्षे शहराचे लोकप्रतिनिधीत्व करणार्‍यांना शहर विकास करण्याची इच्छाशक्तीच नसल्याची टीका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. नगरकरांना पंचवीस वर्षात आमदार निधी कसा अन् काय असतो हे कळाले नाही. शहरातील नागरिकांनी लोकप्रतिनिधी बदलल्यानंतर त्यांना आमदार निधी कळाला असल्याचे सांगत त्यांनी आमदार जगताप यांच्या कार्याचे कौतुक केले.
आमदार अरुण जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून माजी नगरसेवक निखील वारे, नगरसेविका रुपाली वारे यांच्या प्रयत्नातून प्रभाग दोनमधील मच्छिंद्र हौसिंग सोसायटीत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या श्री छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचा लोकार्पण सोहळा विखे पाटील यांच्या हस्ते मंगळवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, उपमहापौर सुवर्णा कोतकर, निखील वारे, रुपाली वारे, जयश्री सोनवणे, फैय्याज शेख, समदखान, बाळासाहेब पवार, बाबुशेट टायरवाले, सुनील कोतकर, सुवालाल गुंदेचा, उपायुक्त भालचंद्र बेहेरे, सुनीता कांबळे, सविता कराळे, सविता मोरे आदी यावेळी उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले, पंचवीस वर्षे शहराचे प्रतिनिधीत्व करणार्‍या नेत्यात विकास करण्याची इच्छाशक्तीच नव्हती. ग्रामीण भागातील नागरिक शहरात स्थलांतरित होत असल्याने शहराचे विस्तारीकरण वाढत आहे. नगरपालिकांची महापालिका होते, पण महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारत नाही. शहर व ग्रामीण भागाच्या समस्या वेगळ्या आाहेत. समाजातील विषमता दूर कधी होईल माहिती नाही, पण वैचारिक विषमता दूर होणे गरजेचे आहे. तरच शहराची प्रगती होते. आमदार जगताप यांनी शहराला वायफाय शहर करण्याचा संकल्प करावा असे सुचवित तंत्रज्ञान लोकांच्या दाराशी पोहचवा असे आवाहन त्यांनी केले.
आमदार संग्राम जगताप यांनी शहर विकासाचे मोठे प्रकल्प हाती घेण्यात आल्याचे सांगत उपनगराच्या विकासावर लक्ष केंद्रीत केल्याचे सांगितले. उद्यानाच्या कामात अनेकांनी खोडा घातला पण वारे यांच्या पाठपुराव्यामुळे हे उद्यान साकारू शकले असे संग्राम जगताप यांनी सांगितले. उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी या उद्यानात महिलांसाठी जॉगिंग ट्रॅक केल्यामुळे नगरसेविका रुपाली वारे यांचे अभिनंदन केले. प्रास्तविक निखील वारे यांनी तर रुपाली वारे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
....
फोटो आहे.

Web Title: Radhakrishna Vikhe-Patil: The launch of Shri Chhatrapati Sambhaji Maharaj Garden in the twenty-fifth year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.