जम्मू-काश्मीरमध्ये दोन गटांत राडा, अनेक वाहने फोडली

By Admin | Updated: June 15, 2016 10:16 IST2016-06-15T09:44:20+5:302016-06-15T10:16:59+5:30

जम्मूतील जानीपूर येथे मंगळवारी रात्री दोन गटांमध्ये काही कारणावरून झालेल्या वादावादीचे पर्यवसन हाणामारीत होऊन मोठा राडा होऊन व ७ जण जखमी झाले.

Rada, several vehicles in two groups in Jammu and Kashmir | जम्मू-काश्मीरमध्ये दोन गटांत राडा, अनेक वाहने फोडली

जम्मू-काश्मीरमध्ये दोन गटांत राडा, अनेक वाहने फोडली

ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. १५ - जम्मूतील जानीपूर येथे मंगळवारी रात्री दोन गटांमध्ये काही कारणावरून झालेल्या वादावादीचे पर्यवसन हाणामारीत होऊन मोठा राडा झाला. त्यावेळी एका गटाने थेट पोलीस ठाण्यावर हल्ला करून तेथील वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली. या घटनेत ७जण जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव मोबाईल फोन आणि इंटरनेवर वापरावर बंदी घातली आहे.
 
धार्मिक स्थळी प्रवेश केल्यावरुन एका युवकाला काही जणांकडून जबर मारहाण करण्यात आली होती. मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केल्याने वाद आणी भडकला व दोन गटांमध्ये राडा झाला. त्यावेळी काही लोकांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. तसेच परिसरातील वाहनांची तोडफोड करत पेटवून दिली. तब्बल सात तास आंदोलक आणि पोलिसांमध्ये ही धुमश्चक्री सुरु होती. 
 

Web Title: Rada, several vehicles in two groups in Jammu and Kashmir