शहरं
Join us  
Trending Stories
1
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
2
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
3
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
4
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
5
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
6
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
7
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
8
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
9
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
11
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
12
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
13
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
14
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
15
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
16
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
17
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
18
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
19
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
20
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर

Coronavirus: कोरोना लसनिर्मितीची शर्यत; भारत आघाडीवर, जाणून घ्या 'या' ३ लशीची सद्यस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2020 07:16 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी या तीनही शहरांचा धावता दौरा करत लस संशोधन कार्यातील प्रगतीचा आढावा घेतला. या पार्श्वभूमीवर तीन प्रकल्पांची थोडक्यात माहिती...

कोरोनाला वेसण घालण्यासाठी त्यावर प्रतिबंधक लस संशोधनाच्या या शर्यतीत भारतही आघाडीवर आहे. भारतात अहमदाबाद, पुणे आणि हैदराबाद या तीन ठिकाणी लस संशोधनाचे काम प्रगतिपथावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी या तीनही शहरांचा धावता दौरा करत लस संशोधन कार्यातील प्रगतीचा आढावा घेतला. या पार्श्वभूमीवर तीन प्रकल्पांची थोडक्यात माहिती...

लसीचे नाव : झायकोव-डीफॉर्म्युला : झायडस बायोटेक कंपनीचे नाव : झायडस बायोटेकसद्य:स्थिती : तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरूपूर्णपणे स्वदेशी असलेल्या झायकोव-डी या लसीवर झायडस बायोटेक कंपनीत जुलै महिन्यापासून संशोधन सुरू आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्याही झाल्या आहेत. झाय़कोव-डी ही लस पुढील वर्षीच्या मार्च महिन्यापर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे. या लसीच्या किती मात्रा लागतील, हे मात्र अद्याप निश्चित झालेले नाही.

लसीचे नाव : कोविशील्डफॉर्म्युला : ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲस्ट्राझेनेका ही ब्रिटिश औषध कंपनी  कंपनीचे नाव : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सद्य:स्थिती : चाचण्या अंतिम टप्प्यात सर्वाधिक प्रमाणात लस बनविणारी संस्था असा जगभरात नावलौकिक असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटने कोविशील्डच्या १ अब्ज मात्रांसाठी ॲस्ट्राझेनेकाशी करार केला आहे. भारतात सर्वप्रथम हीच लस तयार होईल, असा तज्ज्ञांचा दावा आहे. कोविशील्ड लसीच्या सरासरी ७२ टक्के मात्रा मानवी चाचण्यांमध्ये परिणामकारक असल्याचे आढळून आले आहे. जानेवारी, २०२१ पासून दरमहा ५ ते ६ कोटी लसी सीरममध्ये तयार केल्या जातील, असे अपेक्षित आहे. 

लसीचे नाव : कोव्हॅक्सिनफॉर्म्युला : भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)कंपनीचे नाव : भारत बायोटेकसद्य:स्थिती : तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू कोव्हॅक्सिन या लसीच्या निर्मितीसाठी भारत बायोटेक व आयसीएमआर एकत्र आले आहेत. २६ हजार लोकांवर या लसीचे प्रयोग करण्यात आले. तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या सध्या सुरू आहेत. जानेवारीपर्यंत त्याचे निष्कर्ष प्राप्त होण्याची शक्यता आहे. हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी अंबाला कॅन्टोन्मेंटमधील एका रुग्णालयात या लसीची एक मात्रा घेतली आहे. मोठ्या समुदायावरील लसीची चाचणी यशस्वी ठरल्यास पुढील वर्षाच्या सुुरुवातीलाच कंपनी या लसीच्या वापराबाबत सरकारकडे परवानगी मागेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत