RAC प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, भारतीय रेल्वेने उचलले 'हे' महत्त्वाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 17:17 IST2024-12-12T17:16:55+5:302024-12-12T17:17:26+5:30
रेल्वेकडून आरएसी तिकीट असणाऱ्यांना एक सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

RAC प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, भारतीय रेल्वेने उचलले 'हे' महत्त्वाचे पाऊल
नवी दिल्ली : भारतात दररोज अनेक प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. यामध्ये तिकीट आरक्षित करुन प्रवास करणाऱ्या लोकांची संख्याही मोठी आहे. तर अनेक प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळत नाही. काही प्रवाशांचे तिकीट वेटींगवर असते तर काहींना आरएसी (Reservation Against Cancellation) तिकीट मिळते.
अशातच आता आरएसी तिकीट मिळणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. रेल्वेकडून आरएसी तिकीट असणाऱ्यांना एक सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या एसी कोचमध्ये आरएसी तिकीट असणाऱ्यांना बेडरोल, बेडशीट, ब्लँकेंट आणि उशी दिली जात नव्हती. आता ही सुविधा आरएसी धारकांना मिळणार आहे.
आरएसी तिकीट असणाऱ्यांना साइड लोअर बर्थवर अर्ध्या सिटीवर प्रवास करावा लागतो. साइड लोअरच्या खालच्या सीटवर दोन जण मिळून प्रवास करतात. रेल्वेत आरएसी तिकीट धारकांकडून पूर्ण पैसे घेतले जात होते. परंतु कन्फर्म तिकिटासारख्या सुविधा दिल्या जात नव्हत्या. त्यामुळे आता या प्रवाशांना सुद्धा कन्फर्म तिकीट धारकांप्रमाणे बेडरोल आणि इतर सुविधा मिळणार आहे.
यासंदर्भात बोलताना रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अशोक कुमार यांनी सांगितले की, आरएसी तिकीट धारकांना कन्फर्म तिकीट धारकांना मिळणाऱ्या सर्व सुविधा देण्यात येणार आहे. प्रवासी बर्थवर पोहोचताच कोच अटेंडंट बेडरोल पुरवेल. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि समाधानासाठी ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.
आता या सुविधा मिळणार!
- आता आरएसी तिकीटावर प्रवास करणाऱ्या दोन्ही प्रवाशांना वेगवेगळे बेड रोल, ब्लॅकेट, उशी दिली जाईल. त्यामुळे भेदभावचा आरोप संपणार आहे.
- एसी कोचमध्ये थंडीपासून वाचण्यासाठी पॅकेटमध्ये असणारे सर्व सामान मिळणार आहे. त्यात बेडशीट, पिलो, ब्लॅकेटचा समावेश आहे.
- आरएसी तिकीट आणि कन्फर्म तिकीट धारकांमध्ये कोणताही भेदभाव असणार नाही. सर्व भेदभाव संपणार आहे.