रिव्हॉल्वर राणी - लग्न मोडण्यासाठी तिने नवरदेवाच्या कानपट्टीवर लावली बंदूक
By Admin | Updated: May 12, 2017 18:48 IST2017-05-12T17:33:45+5:302017-05-12T18:48:32+5:30
लग्नाचा सनई-चौघडा वाजत असतानाच अचानक तिथे एक मुलगी येते तिही हातात बंदूक घेऊन...असा प्रकार तूम्ही अनेक चित्रपटात पाहिला असेल..

रिव्हॉल्वर राणी - लग्न मोडण्यासाठी तिने नवरदेवाच्या कानपट्टीवर लावली बंदूक
ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. 12 - लग्नाचा सनई-चौघडा वाजत असतानाच अचानक तिथे एक मुलगी येते तिही हातात बंदूक घेऊन...असा प्रकार तूम्ही अनेक चित्रपटात पाहिला असेल पण कानपूरमध्ये असा प्रसंग घडला आहे. कानपूरमध्ये मंडपात नातेवाईकांसमोर वर-वधू एकमेकांच्या गळ्यात माळा घालणार, तितक्यात एका मुलीने तिथे येऊन नवरदेवाच्या कानपट्टीवर बंदूक लगावत आपलं याच्याशी लग्न झाल्याचा गौप्यसौफ्ठ करत आनंदाच्या वातारणात भयाण शांतता निर्माण केली.
बुधवारी कानपूरयेथील देहात भागात ही घटना घडली आहे. देहातमधील शिवलीच्या विश्रामगृहात देवेंद्र अवस्थीचे लग्न सुरु होते. तो वधूच्या गळ्यात माळ घालणार तोच एक मुलगी हातात रिव्हॉल्वर घेऊन मंडपात घुसली आणि थेट देवेंद्रवरच बंदुकी धरली. याच्याशी आपले आधीच लग्न झाले आहे. त्यामुळे देवेंद्र आता दुसऱ्या कुठल्याही मुलीशी लग्न करू शकत नसल्याचेही ती म्हणाली.
चित्रपटात घडते त्याप्रमाणे देवेंद्रने आपण त्या मुलीला ओळखण्यास नकार दिला. देवेंद्रच्या या नकारानंतर त्या मुलीने बंदूक स्वत:च्या कानपट्टीवर लावून धरली आणि आत्महात्येची धमकी दिली. यावेळी आपले देवेंद्रशी शारीरिक संबंधही आल्याचे आणि त्यातून आपण गर्भवती राहिल्याचे आरोप त्या मुलीने केले. हे ऐकल्यानंतर जिच्या गळ्यात देवेंद्र माळ घालणार होता, त्या वधूने लग्नासाठी नकार दिला.