पोंधवडीच्या सरपंचपदी राणी बंडगर
By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:19+5:302015-08-27T23:45:19+5:30
शेटफळगढे : पोंधवडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राणी नानासाहेब बंडगर, तर उपसरपंचपदी दत्तात्रय हरिबा पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

पोंधवडीच्या सरपंचपदी राणी बंडगर
श टफळगढे : पोंधवडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राणी नानासाहेब बंडगर, तर उपसरपंचपदी दत्तात्रय हरिबा पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.येथील ग्रामपंचायत कार्यालयात नुकतीच विशेष बैठक झाली. त्यामध्ये निर्धारित वेळेत सरपंचपदासाठी बंडगर यांचा, तर उपसरपंचपदासाठी पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी जाहीर केले. या वेळी माजी सरपंच नानासाहेब बंडगर, तुळशीराम खारतोडे, दादा भोसले, दादा काशिद, नवनाथ बंडगर उपस्थित होते.फोटो : राणी बंडगर, दत्तात्रय पवार२७०८२०१५-बारामती-१५