गोळ्या घालायच्या असल्यास मला घाला, पण दलितांवर हल्ले करू नका- मोदी

By Admin | Updated: August 7, 2016 21:01 IST2016-08-07T21:01:28+5:302016-08-07T21:01:28+5:30

गोळ्या घालायच्या असल्यास मला घाला, पण दलितांवर हल्ले करू नका, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

Put me if you want to put a tablet but do not attack dalits - Modi | गोळ्या घालायच्या असल्यास मला घाला, पण दलितांवर हल्ले करू नका- मोदी

गोळ्या घालायच्या असल्यास मला घाला, पण दलितांवर हल्ले करू नका- मोदी

ऑनलाइन लोकमत

हैदराबाद, दि. 7-  गोळ्या घालायच्या असल्यास मला घाला, पण दलितांवर हल्ले करू नका, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. हैदराबादमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. गुजरातमध्ये उना येथे मेलेल्या गायीचे कातडे सोलणाऱ्या दलितांना मारहाण व गोरक्षणाच्या नावाने दलित व मुस्लिमांना मारहाण करून प्रसंगी त्यांचे खून करणे अशा घटना घडत असल्याचे प्रकार समोर आले होते. त्याबाबत हिंदुत्ववाद्यांच्या आशीर्वादाने गोरक्षकांनी उच्छाद मांडला असूनही मोदी चकार शब्द काढत नाहीत, अशी टीका विरोधकांकडून होत होती. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडलं आहे. दलितांवर अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य करताना दलितांवर अत्याचार करणा-यांवर हल्ला चढवला आहे. गोळी चालवायची असल्यास माझ्यावर चालवा दलितांवर नको, असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले आहेत.

Web Title: Put me if you want to put a tablet but do not attack dalits - Modi