शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
4
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
5
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
6
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
7
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
8
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
9
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
10
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
11
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
12
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
13
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
14
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
15
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
16
जन्मभर विसरणार नाही असा धडा भारतास शिकवू; सिंधू जल करार स्थगितीमुळे पाकच्या धमक्या वाढल्या
17
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
18
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
19
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
20
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी

इव्हीएमवर शंका घेणाऱ्या काँग्रेसला सर्वोच्च न्यायालयात धक्का, याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 17:06 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत इव्हीएमसोबतच VVPAT मशीनमधील मतांची मोजणी करण्याची मागणी करणारी काँग्रेसची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत इव्हीएमसोबतच VVPAT मशीनमधील मतांची मोजणी करण्याची मागणी करणारी काँग्रेसची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. गुजरातमधील प्रचारात जनतेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतरही काँग्रेसला गुजरात विधानसभा निवडणुकीत विजय मिळण्याबाबत साशंकता आहे. इव्हीएमच्या माध्यमातून आपल्याशी दगाफटका होऊ शकतो असा संशय व्यक्त करत काँग्रेसने इव्हीएमसोबतच 25 टक्के VVPAT मधील चिठ्ठ्यांचीही मतमोजणी व्हायला हवी, अशी मागणी काँग्रेसने केली होती.   गुजरातमधील शेवटच्या टप्प्यातील मतदान गुरुवारी संपताच विविध वृत्तवाहिन्यांच्या मतदानोत्तर सर्वेक्षणांचे (एक्झिट पोल) अंदाज आले होते. सर्व एक्झिट पोलमधून गुजरातेत भाजपाच पुन्हा एकवार मोठ्या बहुमताने सत्तेवर येईल, असे एकमत झाले आहे. गुजरातमध्ये सोमवार, १८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.गुजरातमध्ये दोन टप्प्यांत मतदान झाले होते दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपताच राज्यामध्ये घेतलेल्या एक्झिट पोलचे निष्कर्ष वृत्तवाहिन्यांनी जाहीर केले. त्यांच्या निष्कर्षात भाजपा व काँग्रेस या दोन पक्षांना मिळू शकणा-या जागांबाबत एकमत नसले, तरी गुजरातमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता येईल, यावर या सर्वांमध्ये एकवाक्यता आहे. या अंदाजांनंतर काँग्रेसच्या गोटात धाकधुक वाढली आहे. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचे गृहराज्य असल्याने या निवडणुकीत या दोघांची व्यक्तिगत प्रतिष्ठा पणाला लागली होती. विशेषत: सलग १२ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले मोदी ते पद सोडून पंतप्रधान म्हणून दिल्लीत गेल्यावर त्यांची या राज्यावरील पकड सैल झाली की अधिक बळकट झाली याचा कौल म्हणून या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मोदींनीही काहीही झाले तरी गुजरात हातचे जाऊ द्यायचे नाही या पक्क्या इराद्याने पंतप्रधानपदाच्या सर्व जबाबदा-या बाजूला ठेवून प्रचाराचे जातीने नेतृत्व केले. दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा मिळालेले राहुल गांधी यांनीही नव्या दमाने व कल्पकतेने प्रचाराची शिकस्त केली.सरतेशेवटी दोन्ही बाजूंकडून प्रचाराची पातळी घसरली आणि गुजरातची निवडणूक ही मोदी व राहुल गांधी यांच्यातील व्यक्तिगत लढाई असे चित्र निर्माण झाले. ‘एक्झिट पोल’ हे ब्रह्मवाक्य नाही हे मान्य केले आणि याआधी अनेक एक्झिट पोलचे अंदाज काही वेळा सपशेल चुकलेही आहेत हे गृहीत धरले आणि यंदा आकडे कमी-जास्त झाले तरी त्यातून दिसणारा सत्तेचा अंतिम कौल चुकेल, असे त्यामुळेच वाटत नाही. 

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसSupreme Courtसर्वोच्च न्यायालय