शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

रशियाकडून क्षेपणास्त्रविरोधी रडारची खरेदी; ड्रॅगनला ठेचण्याची भारताची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 1:17 AM

चर्चेचा मार्गही भारताकडून खुला; नियंत्रण रेषेनजीक भारतीय जवानांचा तळ

टेकचंद सोनवणे

नवी दिल्ली : चीनच्या तूल्यबळ ठरू शकणारे रशियन बनावटीचे क्षेपणास्त्र विरोधी रडार येत्या आॅक्टोबरपर्यंत भारताच्या ताफ्यात दाखल होईल. लद्दाख सीमेवर स्वत:च्या हद्दीत ड्रॅगनने पाय पसरण्यास सुरूवात केल्याने भारतही युद्धसज्ज आहे. हवाई दलास तयार ठेवताना सीमेपलीकडून होणारा हल्ला परतवणारे क्षेपणास्त्रदेखील लद्दाखमध्ये हलवले आहे. त्याच्या जोडीला रशियाच्या एस ४०० रडारही असेल. सध्या भारतीय हवाई दल चीनच्या बरोबरीने शक्तीप्रदर्शन करीत आहे. नियंत्रण रेषेनजीक भारतीय जवानांनी तळ वाढवला आहे. मिग व सुखोई विमानांसमवेत रडारही खरेदी करण्यात येईल. या एका रडारचा अपवाद वगळता हवाई संरक्षणात चीनच्या तुलनेत भारताकडे फक्त संख्याबळाचा फरक आहे.

गलवान खोऱ्यात दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने असताना ड्रॅगनशी भारताची बीजिंगमध्ये चर्चा सुरू आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून या चर्चेची माहिती प्रसिद्ध केली जात नाही. अद्याप प्राथमिक स्तरावर बोलणी सुरू असून गलवान खोºयातील स्थितीत तूर्त कोणताही बदल झालेला नाही. भारताकडून राजदूत विक्रम मिस्त्री तर चिनी परराष्ट्र राज्यमंत्री लुओ झाहुई यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहे.नियंत्रण रेषेचे पालन करावेच लागेल असे चीनला भारताने ठणकावले आहे. दोन्ही देशांमध्ये मागील आठवड्यात तीनदा चर्चा झाली. चिनी परराष्ट्र मंत्रालयानेदेखील यासंबंधीचे वृत्त अथवा चचेर्नंतर निवेदन प्रसिद्ध केलेले नाही. याही आठवड्यात चर्चा होईल.रशिया, अमेरिका, जपानला भारताच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न

  • पँगाँग सरोवराच्या उत्तरेस चीनने बांधकाम सुरू केले आहे. भारतानेदेखील आपल्या हद्दीत बांधकाम प्रारंभ केले. सैनिकांना तळ ठोकण्यासाठी बंकर, खंदक चीनने आपल्या हद्दीत खणले आहेत.
  • चीनला दणका देण्यासाठी एकाचवेळी रशिया, अमिरेका व जपानला भारताच्या बाजूने वळविण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. जपान समवेत युद्धनौका सराव करून भारताने चीनच्या अरेरावीला आव्हान दिले आहे.
  • पाकिस्तान व चीन सीमेवरील काराकोरम पर्वतरांगांमध्येही भारतीय जवानांनी गस्त वाढवली. चीननेदेखील या भागात मोठे बांधकाम हाती घेतले. भारताने बांधकामास प्रारंभ करून त्यास प्रत्यूत्तर दिले. गलवान खोºयातील हिंसक झटापटीस दोन आठवडे पूर्ण झाले.
  • लष्करी स्तरावरील चर्चेत सैनिक मागे घेण्याची तयारी दाखवून चीनने प्रत्यक्षात जादा कुमक मागवली. ड्रॅगनचा इरादा ओळखून भारतानेही आयटीबीपचे २ हजार जवान तैनात केले.
  • तिबेट व झिनझियांग प्रांतात हवाई हालचाली वाढल्या. ड्रोनदेखील आकाशात दिसू लागले. हवाई दलाने याचा अभ्यास करून भारतीय हेलिकॉप्टर्सची संख्याही वाढवली. हवाई हल्ला परतवू शकणारे आधुनिक क्षेपणास्त्रदेखील सज्ज ठेवण्यात आले असून आवश्यक उपकरणांची खरेदी रशियातून केली जाईल.
टॅग्स :IndiaभारतchinaचीनAmericaअमेरिकाrussiaरशिया