रशियाकडून क्षेपणास्त्रविरोधी रडारची खरेदी; ड्रॅगनला ठेचण्याची भारताची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 01:17 AM2020-06-29T01:17:01+5:302020-06-29T07:08:26+5:30

चर्चेचा मार्गही भारताकडून खुला; नियंत्रण रेषेनजीक भारतीय जवानांचा तळ

Purchase of anti-missile radar from Russia; India ready to crush the china | रशियाकडून क्षेपणास्त्रविरोधी रडारची खरेदी; ड्रॅगनला ठेचण्याची भारताची तयारी

रशियाकडून क्षेपणास्त्रविरोधी रडारची खरेदी; ड्रॅगनला ठेचण्याची भारताची तयारी

Next

टेकचंद सोनवणे

नवी दिल्ली : चीनच्या तूल्यबळ ठरू शकणारे रशियन बनावटीचे क्षेपणास्त्र विरोधी रडार येत्या आॅक्टोबरपर्यंत भारताच्या ताफ्यात दाखल होईल. लद्दाख सीमेवर स्वत:च्या हद्दीत ड्रॅगनने पाय पसरण्यास सुरूवात केल्याने भारतही युद्धसज्ज आहे. हवाई दलास तयार ठेवताना सीमेपलीकडून होणारा हल्ला परतवणारे क्षेपणास्त्रदेखील लद्दाखमध्ये हलवले आहे. त्याच्या जोडीला रशियाच्या एस ४०० रडारही असेल. सध्या भारतीय हवाई दल चीनच्या बरोबरीने शक्तीप्रदर्शन करीत आहे. नियंत्रण रेषेनजीक भारतीय जवानांनी तळ वाढवला आहे. मिग व सुखोई विमानांसमवेत रडारही खरेदी करण्यात येईल. या एका रडारचा अपवाद वगळता हवाई संरक्षणात चीनच्या तुलनेत भारताकडे फक्त संख्याबळाचा फरक आहे.

गलवान खोऱ्यात दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने असताना ड्रॅगनशी भारताची बीजिंगमध्ये चर्चा सुरू आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून या चर्चेची माहिती प्रसिद्ध केली जात नाही. अद्याप प्राथमिक स्तरावर बोलणी सुरू असून गलवान खोºयातील स्थितीत तूर्त कोणताही बदल झालेला नाही. भारताकडून राजदूत विक्रम मिस्त्री तर चिनी परराष्ट्र राज्यमंत्री लुओ झाहुई यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहे.
नियंत्रण रेषेचे पालन करावेच लागेल असे चीनला भारताने ठणकावले आहे. दोन्ही देशांमध्ये मागील आठवड्यात तीनदा चर्चा झाली. चिनी परराष्ट्र मंत्रालयानेदेखील यासंबंधीचे वृत्त अथवा चचेर्नंतर निवेदन प्रसिद्ध केलेले नाही. याही आठवड्यात चर्चा होईल.

रशिया, अमेरिका, जपानला भारताच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न

  • पँगाँग सरोवराच्या उत्तरेस चीनने बांधकाम सुरू केले आहे. भारतानेदेखील आपल्या हद्दीत बांधकाम प्रारंभ केले. सैनिकांना तळ ठोकण्यासाठी बंकर, खंदक चीनने आपल्या हद्दीत खणले आहेत.
  • चीनला दणका देण्यासाठी एकाचवेळी रशिया, अमिरेका व जपानला भारताच्या बाजूने वळविण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. जपान समवेत युद्धनौका सराव करून भारताने चीनच्या अरेरावीला आव्हान दिले आहे.
  • पाकिस्तान व चीन सीमेवरील काराकोरम पर्वतरांगांमध्येही भारतीय जवानांनी गस्त वाढवली. चीननेदेखील या भागात मोठे बांधकाम हाती घेतले. भारताने बांधकामास प्रारंभ करून त्यास प्रत्यूत्तर दिले. गलवान खोºयातील हिंसक झटापटीस दोन आठवडे पूर्ण झाले.
  • लष्करी स्तरावरील चर्चेत सैनिक मागे घेण्याची तयारी दाखवून चीनने प्रत्यक्षात जादा कुमक मागवली. ड्रॅगनचा इरादा ओळखून भारतानेही आयटीबीपचे २ हजार जवान तैनात केले.
  • तिबेट व झिनझियांग प्रांतात हवाई हालचाली वाढल्या. ड्रोनदेखील आकाशात दिसू लागले. हवाई दलाने याचा अभ्यास करून भारतीय हेलिकॉप्टर्सची संख्याही वाढवली. हवाई हल्ला परतवू शकणारे आधुनिक क्षेपणास्त्रदेखील सज्ज ठेवण्यात आले असून आवश्यक उपकरणांची खरेदी रशियातून केली जाईल.

Web Title: Purchase of anti-missile radar from Russia; India ready to crush the china

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.