म्युच्युअल फंडाद्वारे 5,000 कोटींची शेअर खरेदी
By Admin | Updated: August 20, 2014 01:44 IST2014-08-20T01:44:43+5:302014-08-20T01:44:43+5:30
बाजार कल सुधारल्याने जुलैमध्ये म्युच्युअल फंड कंपन्यांनी जुलैमध्ये सुमारे 5 हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्य असलेल्या शेअर्सची खरेदी केली.

म्युच्युअल फंडाद्वारे 5,000 कोटींची शेअर खरेदी
नवी दिल्ली : बाजार कल सुधारल्याने जुलैमध्ये म्युच्युअल फंड कंपन्यांनी जुलैमध्ये सुमारे 5 हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्य असलेल्या शेअर्सची खरेदी केली. गेल्या साडेसहा वर्षातील मासिक गुंतवणुकीची ही उच्चंकी पातळी आहे. सलग तिस:या महिन्यात यात वाढ नोंदली गेली.
तसेच म्युच्युअल फंड कंपन्यांनी याच कालावधीत ऋण बाजारांमध्ये सुमारे 19 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यापूर्वी जूनमध्ये म्युच्युअल फंडांनी समभागात 3,34क् कोटी रुपये आणि मेमध्ये 1क्5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये समभाग बाजारात म्युच्युअल फंड कंपन्यांद्वारे मोठय़ा प्रमाणात विक्री झाली होती. दुसरीकडे ऑगस्ट 2क्13 मध्ये फंडांनी 1,6क्7 कोटी रुपयांर्पयतच्या शेअरची खरेदी केली होती. सेबीच्या आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंड कंपन्यांनी गेल्या महिन्यात 5,क्64 कोटी रुपये मूल्य असलेल्या शेअरची खरेदी केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)