शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

४ हजार प्रतिचौरस मीटरची जमीन २८,०९० दराने खरेदी; अयोध्येत घोटाळा, विरोधकांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 06:33 IST

काही दिवसांपूर्वी दोन कोटी रुपयांची जमीन १८ कोटी रुपयांना राम मंदिर ट्रस्टने खरेदी केली.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी जमीन खरेदीत झालेल्या कथित गैरप्रकारांवरून नवनव्या खुलाशांनी उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी दोन कोटी रुपयांची जमीन १८ कोटी रुपयांना राम मंदिर ट्रस्टने खरेदी केली. आता त्याच प्रकरणात एक आणखी खुलासा झाला. त्यातून चार हजार रुपये प्रतिचौरस मीटरची जमीन राम मंदिर निर्माण ट्रस्टने २८,०९० रुपये प्रतिचौरस मीटर भावाने खरेदी केली, असे दिसले. 

याप्रकरणी काँग्रेस, माकप आणि समाजवादी पक्षाने केंद्र सरकार, योगी सरकार आणि भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. माकपचे नेते सीताराम येचुरी, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी या पूर्ण प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात यावी, अशी मागणी केली.

काँग्रेसने विचारले की, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशाला हे सांगावे की, फक्त ७९ दिवसांत जमिनीचा भाव १२५० टक्के कसा वाढला? प्रत्यक्षात सरकारने जमिनीचा दर चार हजार रुपये प्रतिचौरस मीटर ठरवलेला आहे. मग राम मंदिर निर्माण ट्रस्टने ती २८,०९० रुपये प्रतिचौरस मीटर भावाने का विकत घेतली?

काँग्रेसचे महासचिव रणदीप सुरजेवाला यांनी आरोप केला की, आता तर राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दासही म्हणत आहेत की, ट्रस्टच्या पैशांचा वापर कसा होत आहे, याबाबत चम्पत राय यांनी काहीही चर्चा केली नाही. नृत्य गोपाल दास यांचा आरोप याचा संकेत देतो की ट्रस्टमध्ये बसलेले लोक काेट्यवधी रुपयांचा घोटाळा करीत आहेत. स्वामी स्वरूपानंद यांनीही पैशांच्या दुरुपयोगाचा आरोप केला आहे.

आरोप काय?

काँग्रेसचा असाही आरोप आहे की, जमीन विकणारा दीप नारायण उत्तर प्रदेश भाजपचा नेता असून, अयोध्येचे महापौर ऋषिकेश उपाध्याय यांचा जवळचा नातेवाईक आहे. दीप नारायणने २,२४७ च्या भावाने जमीन खरेदी केली आणि फक्त ७९ दिवसांत २८,०९० रुपये दराने ट्रस्टला विकून टाकली. जमिनीच्या खरेदी-विक्रीचा दस्तावेज सार्वजनिक झाला असून, त्यातून हे सिद्ध होते की, जमीन खरेदीत मोठा घोटाळा झाला आहे. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याyogi adityanathयोगी आदित्यनाथcongressकाँग्रेसBJPभाजपा