पंजाबी संगीतविश्वाला मोठा धक्का बसला आहे. लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांचे वयाच्या ३५ व्या वर्षी निधन झाले. २७ सप्टेंबर रोजी एका गंभीर रस्ते अपघातात ते गंभीर जखमी झाले, त्यानंतर मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ११ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर गुरुवारी या लोकप्रिय गायकाची प्राणज्योत मालवली. राजवीर यांच्या निधनाने संपूर्ण संगीतविश्व त्यांचे कुटुंब आणि त्यांच्या लाखो चाहत्यांवर शोककळा पसरली.
राजवीर हे २७ सप्टेंबर रोजी शिमलाला जात असताना पिंजोर- नालागड रस्त्यावर अचानक त्यांच्या दुचाकीसमोर दोन बैल आले. स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांची दुचाकी जवळच्या बोलेरो गाडीवर आदळली आणि ते गंभीर जखमी झाले, असे सांगितले जात आहे.
मृत्युशी झुंज अपयशी
अपघातात गंभीर जखमी झालेल्या राजवीर यांना तात्काळ मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सततच्या उपचारानंतरही त्यांच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होत नव्हता. गेल्या दहा दिवसांपासून ते शुद्धीवर आले नव्हते आणि त्यांच्या शरीरात कोणतीही हालचाल नव्हती. अखेर आज त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.
पंजाबी संगीतविश्वावर शोककळा
राजवीर जवंदा हे पंजाबमधील प्रचंड लोकप्रिय गायकांपैकी एक होते. सोशल मीडियावर त्यांची प्रचंड फॅन फॉलोइंग होती. इंस्टाग्रामवर त्यांचे २.४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत आणि त्यांच्या युट्यूब चॅनेलला जवळपास १० लाखा लोकांनी सबस्क्राइब केले आहे. राजवीर यांच्या निधनाने लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
प्रसिद्ध गाणे
राजवीरने आपल्या अनेक हिट गाण्यांनी चाहत्यांची मने जिंकली, ज्यात 'सरदारी', 'झोर', 'काली जावंडे दी', 'रब करके' आणि 'मेरा दिल' यांचा समावेश आहे. शिवाय, तो ‘सोहनी’, ‘तू दिसदा पायंडा’, ‘मोरनी’, ‘ध्यान’, ‘खुश रेह कर’ आणि ‘जोगिया’ यांसारख्या गाण्यांमुळेही चांगलाच गाजला. याचबरोबर राजवीरने ‘जिंद जान’, ‘सुभेदार जोगिंदर सिंग’, ‘मिंदो तसीलदारनी’ आणि ‘काका जी’ या पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले.
Web Summary : Punjabi singer Rajveer Jawanda, 35, passed away after a road accident. He was hospitalized for 11 days following the September 27th crash. Jawanda was injured when his bike collided with a vehicle while avoiding bulls. His death brings grief to the music world.
Web Summary : पंजाबी गायक राजवीर जवंदा, 35 वर्ष, का सड़क दुर्घटना में निधन हो गया। 27 सितंबर को दुर्घटना के बाद उन्हें 11 दिनों तक अस्पताल में भर्ती कराया गया था। सांडों से बचने के दौरान उनकी बाइक एक वाहन से टकरा गई थी। उनके निधन से संगीत जगत में शोक है।