वैदर्भीय औदार्याने जिंकली पंजाबी मने!
By Admin | Updated: April 4, 2015 00:05 IST2015-04-04T00:05:58+5:302015-04-04T00:05:58+5:30
घुमान साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पंजाब सरकारकडून दिलेल्या मदतीमुळे पंजाबी औदार्याची चर्चा होत असताना शिख धर्मीयांसाठी दोन महत्वाचे रस्ते

वैदर्भीय औदार्याने जिंकली पंजाबी मने!
राजेश पुनूरकर, (संत नामदेव नगरी) -
घुमान साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पंजाब सरकारकडून दिलेल्या मदतीमुळे पंजाबी औदार्याची चर्चा होत असताना शिख धर्मीयांसाठी दोन महत्वाचे रस्ते आणि पंजाब साहित्य अकादमीचे संमेलन घेण्यासाठी पुढच्या वर्षी नागपूरचे आमंत्रण देऊन केंद्रीय भूपृष्ठ वाहतक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी वैदर्भीय औदार्याचेही उदाहरण घालून दिले.
संमेलनाच्या उद्घाटन समारंभात शिख धर्मीयांसाठी अत्यंत महत्वाचा असणारा अमृतस-घुमान- हरगोबींदपूर- तांडा या रस्त्याची घोषणा गडकरी यांनी केली. महत्वाची तीर्थक्षेत्रे जोडणाऱ्या या चार पदरी सिमेंटच्या रस्त्यासाठी तब्बल १८०० कोटी रुपयांचा निधी जाणारआहे. त्याचबरोबर पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी नांदेडसाहेब ते आनंदपूरसाहेब या रस्त्याची मागणी केली. व्यासपीठावरूनच गडकरी यांनी त्याला मंजूरी असल्याचे सांगितले. यावर बादल म्हणाले, ‘‘ गडकरी यांनीआजपर्यंत पंजाबला कधीही विन्मुख केले नाही.’’
बादल यांनी आपल्या भाषणात मराठी साहित्याचे संमेलन ज्या पध्दतीने पंजाबध्ये झाले तसे पंजाबी साहित्याचे संमेलन महाराष्ट्रात व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे भाषण संपल्यावर गडकरी यांनी व्यासपीठावरून पुन्हा एकदा पुढील वर्षीच पंजाब साहित्य अकादमीचे संमेलन नागपूर येथे घेण्यासाठी आमंत्रण दिले. टाळ्यांच्या गजरात त्याचे कौतुक करण्यात आले.
गडकरी यांनी आपल्या भाषणात पंजाब आणि महाराष्ट्राचे अनुबंध उलगडले. ते म्हणाले, ‘‘ संत नामदेव केवळ महाराष्ट्राचे नाही तर ते राष्ट्रीय संत आहेत. घुमानमध्ये गुरुद्वारा आणि मंदिर एकत्रित पाहून आनंद आणि समाधान वाटले. पंजाबने देशासाठी केलेले बलिदान हा देश विसरु शकत नाही. संत नामदेवांवर मराठी लोक प्रेम करतात आणि तितकेच प्रेम पंजाबी लोकही करतात. पंजाब आणि महाराष्ट्राचे ऋणानुबंध कायम आहेत आणि भविष्यातही ते कायम राहतील. पंजाब आणि महाराष्ट्र यांची परंपरा, संस्कृती आणि इतिहास सारखा आहे. साहित्याबद्दल मराठी माणसाला जेवढे प्रेम आहे तेवढेच पंजाबी माणसालाही आहे. आज घुमान या गावी होणारा हा साहित्य संगम देशाच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. केवळ भौतिक सुखाने काही लाभत नाही. संस्कारांची पेरणी समाजात कराी लागते. ते काम संत साहित्य करते. त्यामुळे जीवनाला दिशा मिळते. आम्ही त्याच विचाराने कार्य करतो.