शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

अमरिंदर सिंग भाजपमध्ये जाणार? भविष्यातील योजनेवर कॅप्टन स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 10:40 IST

सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी, सिद्धूंना देशद्रोही म्हणत, ते चरणजीत सिंग चन्नी यांना चालविण्याचा प्रयत्न करत होते, असेही म्हटले आहे...

नवी दिल्ली - पंजाबकाँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. या नाटकाचा पहिला भाग सिद्धू विरुद्ध कॅप्टन असा होता. हा भाग आता संपला आहे. आता तेथे राजकीय नाट्याचा दुसरा भाग सुरू झाला आहे आणि या भागाचे नाव, सिद्धू विरुद्ध राहुल गांधी असे आहे. मंगळवारी नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाबकाँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबच्या कॅबिनेट मंत्र्यासह 4 नेत्यांनीही राजीनामे दिले आहेत. (Punjab politics will captain Amarinder Singh join BJP know what he has to say on future plans)

अमरिंदर सिंग भाजपमध्ये जाणार? पंजाबमध्ये राजकीय महानाट्य सुरू असतानाच, कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपमध्ये जाण्याचे कयास लावले जात आहेत. सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर, एका टीव्ही चॅनलशी बोलताना कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी, सिद्धूंना देशद्रोही म्हणत, ते चरणजीत सिंग चन्नी यांना चालविण्याचा प्रयत्न करत होते, असे म्हटले आहे. मात्र, पक्ष सोडण्यासंदर्भात त्यांनी स्पष्टपणे काहीही उत्तर देणे टाळले. पण, आपण काँग्रेसमध्ये राहणार, की नाही, यासंदर्भात उत्तर देऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

सर्व पर्याय खुले -नवजोतसिंग सिद्धू यांच्याशी झालेल्या वादानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांची काँग्रेस हायकमानबद्दलची नाराजीही दिसून आली होती. यावेळीही त्यांनी भाजपमध्ये जाण्यासंदर्भात कुठलेही स्पष्ट भाष्य केले नव्हते. पण, सर्व पर्याय खुले आहेत, असा इशाराही त्यांनी काँग्रेसला दिला होता. 

त्या वेळी कॅप्टन म्हणाले होते, की अपमानित होऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. सिद्धूंवर निशाणा साधत, सिद्धू देशद्रोही असल्याचे म्हणत,  त्यांना पंजाबचे मुख्यमंत्री होऊ देणार नाही, अशी घोषणाही कॅप्टन यांनी केली होती. 

टॅग्स :congressकाँग्रेसPunjabपंजाबPoliticsराजकारणBJPभाजपा