अमरिंदर सिंग भाजपमध्ये जाणार? भविष्यातील योजनेवर कॅप्टन स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 10:37 AM2021-09-29T10:37:26+5:302021-09-29T10:40:29+5:30

सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी, सिद्धूंना देशद्रोही म्हणत, ते चरणजीत सिंग चन्नी यांना चालविण्याचा प्रयत्न करत होते, असेही म्हटले आहे...

Punjab politics will captain Amarinder Singh join BJP know what he has to say on future plans | अमरिंदर सिंग भाजपमध्ये जाणार? भविष्यातील योजनेवर कॅप्टन स्पष्टच बोलले

अमरिंदर सिंग भाजपमध्ये जाणार? भविष्यातील योजनेवर कॅप्टन स्पष्टच बोलले

Next


नवी दिल्ली - पंजाबकाँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. या नाटकाचा पहिला भाग सिद्धू विरुद्ध कॅप्टन असा होता. हा भाग आता संपला आहे. आता तेथे राजकीय नाट्याचा दुसरा भाग सुरू झाला आहे आणि या भागाचे नाव, सिद्धू विरुद्ध राहुल गांधी असे आहे. मंगळवारी नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाबकाँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबच्या कॅबिनेट मंत्र्यासह 4 नेत्यांनीही राजीनामे दिले आहेत. (Punjab politics will captain Amarinder Singh join BJP know what he has to say on future plans)

अमरिंदर सिंग भाजपमध्ये जाणार? 
पंजाबमध्ये राजकीय महानाट्य सुरू असतानाच, कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपमध्ये जाण्याचे कयास लावले जात आहेत. सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर, एका टीव्ही चॅनलशी बोलताना कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी, सिद्धूंना देशद्रोही म्हणत, ते चरणजीत सिंग चन्नी यांना चालविण्याचा प्रयत्न करत होते, असे म्हटले आहे. मात्र, पक्ष सोडण्यासंदर्भात त्यांनी स्पष्टपणे काहीही उत्तर देणे टाळले. पण, आपण काँग्रेसमध्ये राहणार, की नाही, यासंदर्भात उत्तर देऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

सर्व पर्याय खुले -
नवजोतसिंग सिद्धू यांच्याशी झालेल्या वादानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांची काँग्रेस हायकमानबद्दलची नाराजीही दिसून आली होती. यावेळीही त्यांनी भाजपमध्ये जाण्यासंदर्भात कुठलेही स्पष्ट भाष्य केले नव्हते. पण, सर्व पर्याय खुले आहेत, असा इशाराही त्यांनी काँग्रेसला दिला होता. 

त्या वेळी कॅप्टन म्हणाले होते, की अपमानित होऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. सिद्धूंवर निशाणा साधत, सिद्धू देशद्रोही असल्याचे म्हणत,  त्यांना पंजाबचे मुख्यमंत्री होऊ देणार नाही, अशी घोषणाही कॅप्टन यांनी केली होती.
 

Web Title: Punjab politics will captain Amarinder Singh join BJP know what he has to say on future plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.