शहरं
Join us  
Trending Stories
1
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
2
अमेरिका-चीनशी स्पर्धा; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, PM मोदींचा मोठा निर्णय...
3
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
4
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
5
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
6
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
7
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
8
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
9
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
10
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
11
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
12
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
13
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
14
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
15
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
16
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
17
Krishna Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
18
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
19
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
20
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!

पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 15:24 IST

पोलिसांनी एका आरोपीच्या पायावर मारली गोळी.

चंदीगड: पंजाब पोलिसांनी मंगळवारी राजस्थानमधून पाच जणांना ताब्यात घेतले आहे. आरोपींचा पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेशी संबंधित बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंध आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी एक आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत जखमी झाला. पोलिस महासंचालक (डीजीपी) गौरव यादव यांनी सांगितले की, आरोपी पाकिस्तानस्थित ऑपरेटिव्ह हरविंदर रिंडा याच्या निर्देशांवर काम करायचे. 

स्वातंत्र्य दिनापूर्वी दहशतवादी कट उधळलापकडण्यात आलेले दहशतवादी स्वातंत्र्यदिनी शहीद भगतसिंग नगर आणि पंजाबमधील इतर ठिकाणी हल्ल्याची योजना आखत होते. पंजाबचे पोलिस महासंचालक (डीजीपी) गौरव यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ऑपरेशनची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, "पाकिस्तानातील आयएसआय समर्थित दहशतवादी नेटवर्कविरुद्ध एक मोठे यश मिळवताना, काउंटर इंटेलिजेंसच्या पथकाने पाकिस्तानस्थित ऑपरेटिव्ह हरविंदर रिंडा याच्या निर्देशानुसार परदेशातील हँडलर मन्नू अगवान, गोपी नवशेहरिया आणि झीशान अख्तर यांनी चालवलेले दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त केले. 

या अंतर्गत राजस्थानमधील टोंक आणि जयपूर जिल्ह्यातून पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आणि पुढील नियोजित हल्ले यशस्वीरित्या रोखण्यात आले. या मॉड्यूलने अलीकडेच एसबीएस नगरमधील एका दारू दुकानात हल्ला करण्याची योजना आखली होती. तसेच, स्वातंत्र्यदिनानिमित्त मोठे हल्ले करण्याच्या प्रयत्नात होते. या या दहशतवाद्यांच्या ताब्यातून एक ८६ पी हँड ग्रेनेड, एक .३० बोर पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. आरोपींविरोधात बीएनएस आणि स्फोटक पदार्थ कायद्याच्या संबंधित कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

एका आरोपीला गोळी लागलीअटक केलेल्या आरोपींना परदेशातील झीशान अख्तर आणि बीकेआयचा मास्टरमाइंड मन्नू अगवान याच्याकडून थेट सूचना मिळत होत्या. हे पाकिस्तानस्थित बीकेआय ऑपरेटिव्ह हरविंदर रिंडा याच्यासोबत काम करतात. दरम्यान, आरोपींना पकडताना चकमक झाली, ज्यात एका आरोपीच्या पायाला गोळी लागली. त्याला एसबीएस नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.  

टॅग्स :PunjabपंजाबterroristदहशतवादीPoliceपोलिसPakistanपाकिस्तान