शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

"अरविंद केजरीवाल भगवंत मान यांचा विश्वासघात करणार"; कुमार विश्वास यांच्या घरी पंजाब पोलीस दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 11:01 IST

Kumar Vishwas : कुमार विश्वास यांच्या घराबाहेर काही पोलिस कर्मचारी उभे असल्याचे त्यांनी ट्विट केलेल्या फोटोंमधून दिसून येत आहे.

नवी दिल्ली : पंजाब पोलीस (Punjab Police) बुधवारी सकाळी घरी पोहोचल्याचा दावा आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) माजी नेते कवी कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांनी ट्विट करून केला आहे. यासंदर्भात त्यांनी काही फोटोही ट्विट केले आहेत. या ट्विटमध्ये  कुमार विश्वास यांनी आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर निशाणा साधत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांना इशारा दिला आहे. 

दरम्यान, कुमार विश्वास यांच्या घराबाहेर काही पोलिस कर्मचारी उभे असल्याचे त्यांनी ट्विट केलेल्या फोटोंमधून दिसून येत आहे. ट्विटद्वारे कुमार विश्वास म्हणाले, "सकाळी सकाळी पंजाब पोलिस दारात आले आहेत. एकेकाळी माझ्याद्वारे पार्टी सामील केलेल्या भगवंत मान यांना इशारा करतो की, दिल्लीत बसलेला माणूस, ज्याला तुम्ही पंजाबच्या जनतेने दिलेल्या सत्तेशी खेळू देत आहात, तो एक दिवस तुमचा आणि पंजाबचाही विश्वासघात करेल. देशाने माझा इशारा लक्षात ठेवावा."

निवडणुकीदरम्यान कुमार यांनी केजरीवाल यांच्यावर केले गंभीर आरोपपंजाबमधील निवडणुकीदरम्यान कुमार विश्वास यांनी आप आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. अरविंद केजरीवाल यांनी देश तोडण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले होते. याशिवाय, अरविंद केजरीवाल यांना फुटीरतावाद्यांच्या पाठिंब्याने सरकार बनवायचे होते, असा आरोप कुमार विश्वास यांनी केला होता. तसेच, याबाबत कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्याकडे उत्तरही मागितले होते. 

केजरीवालांचा पटलटवारदरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी कुमार विश्वास यांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. या आरोपांना उत्तर देताना केजरीवाल म्हणाले होते की, शाळा आणि रुग्णालये बांधणारा कदाचित तो जगातील सर्वात गोड दहशतवादी असेल. पंजाबमध्ये 'आप'चा विजय पाहून भाजप, काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्याचे ते म्हणाले होते.

मोहाली क्राईम सेलमध्ये गुन्हे दाखल करण्याचे काम सुरूअरविंद केजरीवाल आणि आप यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल पंजाब पोलिसांकडून मोहालीतील सायबर क्राइम सेलमध्ये गुन्हे दाखल केले जात आहेत. आतापर्यंत भाजप नेते तेजिंदर बग्गा, नवीन कुमार जिंदाल आणि प्रीती गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, कुमार विश्वास यांच्यावर कोणता गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालBhagwant Mannभगवंत मानPunjabपंजाबPoliceपोलिस