शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमध्ये दिसला कुख्यात दहशतवादी झाकीर मुसा, हाय अलर्ट जारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 13:49 IST

कुख्यात दहशतवादी संघटना अल कायदाचा जम्मू काश्मीरमधील कमांडर झाकीर मुसा हा अमृतसरमध्ये दिसल्याचे वृत्त आल्याने खळबळ उडाली आहे.

अमृतसर - कुख्यात दहशतवादी संघटना अल कायदाचा जम्मू काश्मीरमधील कमांडर झाकीर मुसा हा अमृतसरमध्ये दिसल्याचे वृत्त आल्याने खळबळ उडाली आहे. मूसा अमृतसरमध्ये दिसल्याचे कळल्यानंतर पंजाब पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवण्यास सुरुवात केली असून, ठिकठिकाणी झाकीर मूसा याची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. या महिन्याच्या सुरुवातीलाच गुप्तचर विभागाने काश्मीर खोऱ्यात झाकीर मूसा आणि हिजबूलचे दहशतवादी मिळून हल्ला करण्याची योजना आखत असल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर हिज्बुलचे दहशतवादी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे दिसले होते. गुरुदासपूरचे एसएसपी स्हरनदीप सिंह यांनी सांगितले की, ''झाकीर मूसा हा अमृतसरजवळ असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यामुळे आम्ही लोकांना सतर्क करण्यासाठी त्याचे पोस्टर लावले आहेत. झाकीर मुसाबाबत कुठलीही माहिती असेल, तर त्यांनी अशी माहिती पोलिसांनी द्यावी. जैश ए मोहम्मदचे दहशतवादी फिरोझपूरमधून पंजाबमध्ये दाखल होणार असल्याची आम्हाला मिळाली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून आम्ही अनेक उपाय केले आहेत. अतिरिक्त सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.''  

 

तसेच पंजाबच्या डीजीपींनी राज्यातील सर्व महत्त्वाच्या रस्त्यांवर नाकेबंदी करून वाहनांची कसून तपासणी करण्याचे आदेश पंजाब पोलिसांना  दिले आहेत. तसेच भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवर बीएसएफ आणि पोलीस दलाकडून मिळून लक्ष ठेवण्यात येत आहे. काल पठाणकोटच्या माधोपूर भागात चार संशयितांनी एक एसयूव्ही कार बंदुकीचा धाक दाखवून पळवून नेल्याची घटना घडली. त्यातच आता दहशतवादी घुसल्याची माहिती समोर आल्यानं संपूर्ण राज्यातील पोलीस दलाला सतर्कतेचा इशारा देण्याचा आला आहे.

    

टॅग्स :PunjabपंजाबTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी