शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सुफी गायक विरुद्ध अभिनेत्यामध्ये सामना, हंस राज हंस आणि करमजीत अनमोल रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 10:58 IST

Punjab Lok Sabha Election 2024: पंजाबमधील फरीदकोट लोकसभा मतदारसंघात सुफी गायक विरुद्ध पंजाबी अभिनेता, असा सामना रंगणार आहे. भाजपने प्रख्यात सुफी गायक हंस राज हंस यांना तर आपने पंजाबी अभिनेता करमजीत अनमोल यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

चंडीगड - पंजाबमधील फरीदकोट लोकसभा मतदारसंघात सुफी गायक विरुद्ध पंजाबी अभिनेता, असा सामना रंगणार आहे. भाजपने प्रख्यात सुफी गायक हंस राज हंस यांना तर आपने पंजाबी अभिनेता करमजीत अनमोल यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. हंस राज हंस हे उत्तर-पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत. पंजाबमध्ये येत्या १ जून रोजी १३ लोकसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे. 

सध्या फरीदकोट लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे मोहम्मद सादिक हे खासदार आहेत. तेही पंजाबी लोकगायक आहेत. या मतदारसंघात काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. हंस राज हंस हे गेल्या १५ वर्षांपासून राजकारणात आहेत. ते उत्तर-पश्चिम दिल्लीचे खासदार असले तरी आता फरीदकोटमधून आपले नशीब अजमावणार आहेत. करमजीत अनमोल हा मला धाकट्या भावासारखे आहेत. ते जेव्हा भेटतात तेव्हा अतिशय आदराने माझ्याशी वागतात, असे हंस राज हंस यांनी म्हटले आहे. तर काँग्रेसचे विद्यमान खासदार मोहम्मद सादिक हे मला पित्यासमान आहेत.  

हंस राज हंस यांनी सांगितले की, उत्तर-पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघात मी जे काम केले व फरीदकोट येथे भविष्यात जे काम करणार आहे, त्याबद्दल प्रचारादरम्यान बोलणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीख समुदायासाठी खूप उत्तम कार्य केले आहे. कर्तारपूर कॉरिडॉर खुला केला, हे त्यातील एक महत्त्वाचे काम आहे. 

तीन वेळा केले पक्षांतरहंस राज हंस यांनी शिरोमणी अकाली दलाच्या माध्यमातून २००९ साली राजकारणात प्रवेश केला.त्यावेळी ते जालंधर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढले होते. मात्र, त्यांना हार पत्करावी लागली होती. त्यांनी २०१४ साली शिरोमणी अकाली दलाला सोडचिठ्ठी दिली.त्यानंतर दोन वर्षांनी काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर त्यांनी पुन्हा पक्षांतर केले व ते भाजपमध्ये दाखल झाले. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत ते भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले.

टॅग्स :punjab Lok Sabha Election 2024Punjab Lok Sabha Election 2024BJPभाजपाAAPआपlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४