शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Punjab Election 2022 PM Modi : राज्यात विकासाचा नवा अध्याय सुरू होणार; नवा पंजाब कर्जमुक्त असेल - पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 18:16 IST

देवीच्या चरणी जाण्याची नमन करण्याची, आशीर्वाद घेण्याची इच्छा होती. परंतु प्रशासन आणि पोलिसांनी हात वर केल्याचा पंतप्रधानांनी केला आरोप.

Punjab Election 2022 PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पंजाबमधील जालंधर येथील एका निवडणूक रॅलीला संबोधिक केलं. पंजाबमध्ये भाजपनं कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष, पंजाब लोक काँग्रेस आणि सुखदेव सिंग ढींडसा यांच्या पक्षासोबत युती केली आहे. पंजाबमध्ये सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली रॅली पार पडली. यापूर्वी फिरोजपूरमध्ये त्यांची निवडणूक रॅली होऊ शकली नव्हती. पंतप्रधानांनी आपल्या संबोधनादरम्यान राज्यात एनडीएचं सरकार स्थापन होणार असून राज्यात विकासाचा नवा अध्याय सुरू होईल असा विश्वास व्यक्त केला.

"तुमच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि यात कोणतीही कमतरता जाणवणार नाही," असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिलं. तसंच यावेळी त्यांनी गांधी कुटुंबीयांवरही निशाणा साधला. काँग्रेसचं सरकतार एकाच कुटुंबाच्या रिमोट कंट्रोलवर चालत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. "पंजाबसोबत आपलं जुनं नातं आहे. नवा पंजाब तया करण्यासाठी आपण संकल्पबद्ध आहोत. पंजाब आणि विशेष करून तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कोणतीही कमतरता ठेवली जाणार नाही," असं ते म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी पुलवाना येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. "नवा भारत तेव्हाच तयार होईल, जेव्हा नवा पंजाब बनेल. नवा पंजाब हा कर्जमुक्त असेल, तसंच यात संधीही निर्माण होती. या ठिकाणी वारसाही असेल आणि विकासही होईल. नव्या पंजाबमध्ये भ्रष्टाचार आणि माफियासाठी कोणतीही जागा नसेल. या ठिकाणी कायद्याचं राज्य असेल," असं मोदी म्हणाले. पंजाबमध्ये बदलांसाठी सकारात्मक वातावरण दिसत आहे. पंजाब आता फुट पाडणाऱ्यांऐवजी विकास करणाऱ्या पक्षाच्या बाजूनं उभा राहिला असल्याचंही ते म्हणाले. 

काँग्रेसवर निशाणाकाँग्रेसचं सरकार एका कुटुंबाच्या रिमोट कंट्रोलवर चालतं, असा आरोप पंतप्रधानांनी यावेळी केला. अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वातील सरकार चालवण्यात बाधा निर्माण करणं, सरकार रिमोट कंट्रोलनं चालवण्याचा प्रयत्न केल्यानंतर अमरिंदर सिंग यांना अपमानित करणं असा आरोपही त्यांनी काँग्रेसवर केला. आज तुम्ही काँग्रेसची स्थिती पाहा. या पक्षात फूट पडत आहे. त्यांचेच नेते त्यांना उघडं पाडत आहेत. ज्या पक्षात अंतर्गत लढाई असेल, तो पक्ष पंजाबला स्थिर सरकार देऊ शकत नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

मंदिरात जायचं होतं पण..."आज माझी देवीच्या चरणी जाण्याची नमन करण्याची, आशीर्वाद घेण्याची इच्छा होती. परंतु या ठिकाणी प्रशासन आणि पोलिसांनी हात वर केले. आम्ही व्यवस्था करू शकत नाही. तुम्ही हेलिकॉप्टरनं जा असं त्यांनी सांगितलं," असं मोदी यावेळी म्हणाले.

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस