शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

Punjab Election 2022: सिद्धूंचे अतीलाड महागात पडणार? पंजाब यंदा मोठा झटका देणार; जाणून घ्या कोण येणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 22:55 IST

Punjab Election 2022 Opinion Poll: पंजाब यंदा देशाला मोठा झटका देण्याच्या पवित्र्यात आहे. अवघ्या तेरा दिवसांवर मतदान आलेले असताना पंजाबमध्ये काँग्रेसची पाळेमुळेच उखडली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अवघ्या तेरा दिवसांवर मतदान आलेले असताना पंजाबमध्ये काँग्रेसची पाळेमुळेच उखडली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एबीपी सीव्होटरच्या सर्व्हेत पंजाबमध्ये सत्तेत असलेली काँग्रेस सत्ता गमावताना दिसत आहे. तर भाजपाला त्याहूनही कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. 

पंजाब यंदा देशाला मोठा झटका देण्याच्या पवित्र्यात आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांच्या पंजाब लोक काँग्रेसने भाजपासोबत आघाडी केली आहे. तर आपही मोठ्या ताकदीने निवडणुकीत उतरली आहे. सर्व्हेनुसार काँग्रेसला 117 जागांपैकी 24 ते 30 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर आपला 55 ते 66 जागा मिळण्याचा अंदाज आहे. अकाली दल महायुतीला 20 आणि 26 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपला तीन ते 11 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तर अपक्षांना 0 ते 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 59 जागांची गरज आहे. 

मतांच्या टक्केवारीतही आप जास्त...यंदा आपला सर्वाधिक मते मिळण्याची शक्यता आहे. आपला ४० टक्के, काँग्रेसला ३०, अकाली दल युतीला 20 टक्के तर भाजप युतीला 8 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

गोव्यात काय होणार?गोवा विधनसभा निवडणुकीत काँटे की टक्कर पाहायला मिळू शकते. सर्व्हेच्या अंदाजानुसार, गोव्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होऊ शकते. गोव्यात भाजपला सर्वाधिक म्हणजे ३० टक्के मते मिळतील, तर काँग्रेस आणि आप पक्षाला प्रत्येकी २४ टक्के मते मिळतील. एमजीपी आणि मित्रपक्षाला ८ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. अन्यना १४ टक्के मते मिळण्याची शक्यता सर्व्हेतून वर्तवण्यात आली आहे. सर्व्हेमध्ये भाजपला ४० पैकी १४ ते १८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला १० ते १४ जागा मिळू शकतात. त्याशिवाय आम आदमी पक्षाला ४ ते ८ जागा मिळू शकतात. तर एमजीपीला ३ ते ७ जागांवर समाधान मानावे लागेल. तर अन्य अथवा अपक्षांना ० ते २ जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये काय होणार?

सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करू शकते. २०१७ पेक्षा चांगली कामगिरी करत भाजपला २२५-२३७ जागा मिळू शकतात, तर सपाला १३९-१५१ जागा मिळू शकतात. बसपाला १३-२१ जागांवर समाधान मानावे लागेल. काँग्रेसला फक्त ४-८ आणि इतरांना २-६ जागा मिळू शकतात असं सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूcongressकाँग्रेस