शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'कॅप्टन' कोण?... राहुल गांधी की अमरिंदर सिंग?; सिद्धूंच्या विधानानंतर पंजाबमध्ये 'पोस्टर'वॉर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 13:33 IST

पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू आपल्या वादग्रस्त विधानांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. नको त्या डायलॉगबाजींमुळे आपल्याच सरकारमधील मंत्र्यांच्या निशाण्यावर सध्या सिद्धू आहेत. 

ठळक मुद्दे'कॅप्टन' कोण?... राहुल गांधी की अमरिंदर सिंग?'कॅप्टन' विधानाविरोधात पंजाब सरकारमधील मंत्री नाराजअमरिंदर सिंग हेच आमचे कॅप्टन, पंजाबमध्ये पोस्टरवॉर

नवी दिल्ली - पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू आपल्या वादग्रस्त विधानांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. नको त्या डायलॉगबाजींमुळे आपल्याच सरकारमधील मंत्र्यांच्या निशाण्यावर सध्या सिद्धू आहेत. 'अमरिंदर सिंग हे माजी लष्कर कॅप्टन आहेत. राहुल गांधी हेच माझे कॅप्टन आहेत', असे विधान सिद्धू यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. या विधानानंतर पंजाब सरकारमधील मंत्र्यांनी सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सोमवारी (3 डिसेंबर) पंजाब कॅबिनेटची बैठक होणार आहे. बैठकीत या मुद्यावर मोठा निर्णय येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुपारच्या सुमारास ही बैठक होणार आहे. 

पंजाबमध्ये 'पोस्टरवॉर' पंजाब सरकारमधील तीन मंत्री, ग्रामविकास मंत्री राजिंदर सिंग बाजवा, महसूल आणि पुनर्वसन मंत्री सुखविंदर सिंग सरकारिया तसंच क्रीडा मंत्री राणा गुरमीत सिंग सोढ़ी यांनी सिद्धूंवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. राज्य सरकारमधील जवळपास 10 मंत्र्यांनी सिद्धूंच्या 'कॅप्टन' संदर्भातील विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे मंत्री रवनीत सिंग बिट्ट यांनी तर पंजाबमधील सर्व गल्लीबोळ्यात सिद्धूंविरोधात पोस्टरबाजी केली आहे. 'पंजाबचा कॅप्टन, हाच आमचा कॅप्टन', असा आशय असलेल्या पोस्टरवर त्यांना पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा फोटो आहे. 

 

('भाजपानं देशाला दिलेत तीन मोदी ; नीरव, ललित अन् अंबानींच्या मांडीवर बसलेले नरेंद्र मोदी')

दरम्यान, आज पंजाब कॅबिनेटची बैठक होणार आहे, तर नवज्योतसिंग सिद्धू निवडणुकीच्या प्रचारासाठी राजस्थानमध्ये आहेत. सिद्धू आज नागौरमध्ये असल्या कारणामुळे बैठकीत सहभागी होणार नाहीत. पण जनसभेनंतर ते पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

अमरिंदर सिंग हे माजी लष्कर कॅप्टन आहेत. याचा संदर्भ घेऊन सिद्धू यांनी म्हटले होते की, राहुल गांधी हेच माझे कॅप्टन आहेत. या विधानावरुन नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. ''सिद्धू हे अमरिंदर यांना कॅप्टन समजत नसतील, तर त्यांनी नैतिक जबाबदारीनुसार मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा'', अशी मागणी पंजाब सरकारमधील मंत्र्यांकडून होऊ लागली आहे.दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्याला पाकिस्तानला पाठविलेले नव्हते, असे नवे स्पष्टीकरण नवज्योतसिंग सिद्धू यांनी शनिवारी दिले आणि आधीच्या आपल्या वक्तव्यावरून त्यांनी घूमजाव केले. करतारपूर कॉरिडॉरच्या पायाभरणी समारंभाला हजेरी लावण्यासाठी सिद्धू पाकिस्तानला गेल्याने वाद निर्माण झाला आहे. पण ‘राहुल गांधी यांनीच आपल्याला पाकिस्तानला जायला सांगितले होते, असा दावा सिद्धू यांनी केला होता. त्यावरून नवा वाद निर्माण होताच, सिद्धू यांनी घूमजाव केले.

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPunjabपंजाब