शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

पंजाबमध्ये काँग्रेसची बाजी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपला दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 06:33 IST

local body elections in punjab : देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा मोठा फटका भाजप व अकाली दलाला बसल्याचे दिसत आहे. अकाली दल दुसऱ्या क्रमांकावर दिसत आहे.

चंदीगड : पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेसने दणदणीत विजय मिळविला असून, अकाली दल व भाजप यांचा धुव्वा उडाला आहे. संध्याकाळपर्यंत सातपैकी सहा महापालिकांत व सर्व जिल्हा परिषदांत काँग्रेसला बहुमत मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्ते जोशात आहेत. देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा मोठा फटका भाजप व अकाली दलाला बसल्याचे दिसत आहे. अकाली दल दुसऱ्या क्रमांकावर दिसत आहे. नगरपालिकांच्या मोजणीतही काँग्रेसच आघाडीवर आहे. काही ठिकाणी गुरुवारी मतमोजणी होईल.  भटिंडा, होशियारपूर, कपुरथळा, पठाणकोट, बटाला व अबोहर या महापालिकांमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले. भटिंडामध्ये काँग्रेसला तब्बल ५३ वर्षांनी घवघवीत यश मिळाले आहे. मोगा महापालिकेत ५० पैकी २० जागी काँग्रेस तर १५ जागी अकाली दलाचे उमेदवार विजयी झाले आहेत. आम आदमी पक्षाचे चौघे तर १० जागी अपक्षांनी बाजी मारली आहे. भाजपला इथे केवळ एकाच जागी विजय मिळाला आहे. 

निकालांमुळे काँग्रेसला मिळाली नवसंजीवनीस्थानिक स्वराज्य संस्थांत अपेक्षेपेक्षाही घवघवीत यश मिळाल्याने काँग्रेसला ग्रामीण भागांत नवसंजीवनी मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दिलेला पाठिंबा आणि त्यासाठी आवश्यक ते पाठबळ देण्याचा फायदा पक्षाला मिळाला. आज इतिहास घडला, अशा प्रतिक्रिया देत काँग्रेस नेत्यांना सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला. खासदार सनी देओल यांच्या लोकमसभा मतदारसंघात भाजपला एकही जागा मिळालेली नाही, हे उल्लेखनीय.

ग्रामीण भागांतही बाजी- काँग्रेसने नगरपालिकांमध्येही बाजी मारली आहे. जवळपास सर्व पंचायत समित्याही काँग्रेसच्या ताब्यात आल्या. इतका दणदणीत विजय काँग्रेसला बहुधा पहिल्यांदाच मिळाला आहे. - अकाली दलाने आपला पराभव मान्य केला मात्र या निकालांबाबत  भाजपने प्रतिक्रिया दिलेली नाही. 

अधिक फटका भाजपला बसला - कृषी कायद्यांना विरोध करीत अकाली दल राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडला होता. - आंदोलानाचा अकाली दलापेक्षा अधिक फटका भाजपला बसला आहे. 

टॅग्स :Punjabपंजाबcongressकाँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूक