शहरं
Join us  
Trending Stories
1
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
2
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
3
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
4
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
5
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
6
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
7
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
8
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
9
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
10
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
11
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
12
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
13
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
14
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
15
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
16
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
17
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
18
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
19
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
20
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...

नवदाम्पत्याला पाहून मुख्यमंत्र्यांनी थांबवला ताफा, नवरदेवाला मिठी मारली अन्...; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 12:31 PM

Punjab cm charanjit singh channi viral video : मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी नवदाम्पत्याच्या भेटीसाठी चक्क आपला ताफा थांबवल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Punjab CM Charanjit Singh Channi) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका नवदाम्पत्याला त्यांनी सुखद धक्का दिला आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी नवदाम्पत्याच्या भेटीसाठी चक्क आपला ताफा थांबवल्याची घटना समोर आली आहे. चरणजीत सिंग चन्नी हे भटिंडाच्या दौऱ्यावर असताना मंडी कलन गावात रविवारी त्यांना एक नवविवाहित दाम्पत्य दिसलं, यावेळी त्यांनी आपला गाड्यांचा ताफा थांबवला आणि गाडीतून खाली उतरत नवदाम्पत्याला त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

मुख्यमंत्री अचानक आल्याचं पाहून नवदाम्पत्यासह तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. पंजाब सरकारने देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भोवती पोलिसांचा ताफा असून नवदाम्पत्याच्या नातेवाईकांनीही गर्दी केल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी जोडप्याला शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिला. तसेच नातेवाईकांनी दिलेली मिठाई देखील खाल्ली. त्यांनी नवरा-नवरीशी संवाद साधला. लग्नाबाबत विचारपूस केली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

चंदीगढ-कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात काँग्रेससमोर मोठं राजकीय संकट उभ ठाकलं होतं. अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर अनेक नेत्यांची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा सुरू होती. माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेस नेत्या अंबिका सोनी यांनीही मुख्यमंत्रीपद स्विकारण्यास नकार दिल्यानंतर सुखजिंदरसिंग रंधावा यांचं नाव जवळ-जवळ निश्चित मानलं जात होतं. पण, काँग्रेसने सर्व बड्या नेत्यांना बाजुला करत चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावे चर्चेत होती. पण, काँग्रेसने मुख्यमंत्रीपदासाठीचं नवं नाव जाहीर केलं आहे. पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी चरणजीत सिंग चन्नी यांची निवड करण्यात आली.

कोण आहेत चरणजीत सिंग चन्नी?

चरणजीत सिंग चन्नी हे रामदासिया ह्या शीख समाजाचे नेते आहेत. अमरींदरसिंग यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी औद्योगीक आणि तंत्र शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. चमकूर साहीब या मतदारसंघातून ते तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. 2015 ते 2016 दरम्यान ते पंजाबचे विरोधी पक्ष नेते होते. 

टॅग्स :Punjabपंजाबmarriageलग्नSocial Viralसोशल व्हायरल