शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमध्ये भाजपाकडून काँग्रेसला सुरुंग, दोन आमदार आणि माजी खासदरासह बड्या नेत्यांचा पक्षात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 16:35 IST

Punjab Politics News: BJPने राज्यातील विरोधी पक्षांना सुरुंग लावताना दोन आमदार, एक माजी आमदार आणि एका खासदाराला पक्षात प्रवेश दिला आहे. त्याबरोबरच भारतीय संघातील धडाकेबाज फलंदाज असलेला माजी क्रिकेटपटू Dinesh Mongia यानेही भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

चंदिगड - पंजाब विधानसभेची निवडणूक आता काही महिन्यांवर आली आहे. दरम्यान, या निवडणुकीपूर्वी  भाजपाने राज्यात आपला जनाधार वाढवण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचदरम्यान, आज भाजपानेपंजाबच्या राजकारणात मोठा धमाका केला आहे. भाजपाने राज्यातील विरोधी पक्षांना सुरुंग लावताना दोन आमदार, एक माजी आमदार आणि एका खासदाराला पक्षात प्रवेश दिला आहे. त्याबरोबरच भारतीय संघातील धडाकेबाज फलंदाज असलेला माजी क्रिकेटपटू दिनेश मोंगिया यानेही भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या सर्वांनी आज भाजपाचे नेते गजेंद्रसिंह शेखावत आणि पंजाबचे प्रभारी दुष्यंत गौतम यांच्या उपस्थितीत भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले.

दरम्यान, भाजपामध्ये प्रवेश करणारे दोन्ही खासदार हे काँग्रेसमधील आहेत. काँग्रेसचे कादियाँ मतदारसंघातील खासदार फतेहगंज सिंग बाजवा आणि हरगोबिंदपूर येथील आमदार बलविंदरसिंग लाडी यांनी हात सोडून कमळ हाती घेतले आहे. त्यांच्यासोबत अकाली दलाचे माजी आमदार गुरतेज सिंग घुडियाना, माजी खासदार राजदेव सिंग खालसा, अकाली दलाचे नेते जगदीप सिंग, माजी न्यायाधीश मधुमीत सिंग आणि माजी क्रिकेटपटू दिनेश मोंगिया यानेही भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले आहे.

पंजाबच्या राजकारणाबाबतच्या जाणकारांनी सांगितले की, बाजवा यांचे भाजपामध्ये जाणे हे काँग्रेसला महागात पडू शकते. फतेहगंज सिंग बाजवा हे चंदिगडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रताप सिंग बाजवा यांचे भाऊ आहेत. कादियाँ विधानसभा मतदारसंघातून ते आमदार आहेत. तसेच दोन्ही भावांमध्ये चुरस आहे. काही दिवसांपूर्वी येथे नवज्योत सिंग सिद्धू यांनी सभा घेत फतेहजंग यांन निवडून देण्याचे आवाहन केले होते. मात्र काही दिवसांतच फतेहजंग यांनी पक्ष बदलल्याने काँग्रेसवर नामुष्की ओढवली आहे. दरम्यान, फतेहजंग हे अमरिंदर सिंग यांचे निकटवर्तीय असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच पंजाबमधील माझा भागात यांच्या प्रभाव आहे. त्याचा फायदा भाजपा आघाडीला होऊ शकतो.  

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारणPunjabपंजाब