Arvind Kejriwal: 'आम्हाला काँग्रेसमधला कचरा नकोय, नाहीतर...', अरविंद केजरीवालांनी केला मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 03:03 PM2021-11-23T15:03:35+5:302021-11-23T15:04:52+5:30

Arvind Kejriwal in Punjab: पंजाब दौऱ्यावर असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

punjab assembly elections delhi cm arvind kejriwal attack congress garbage aam aadmi party aap punjab election 2022 | Arvind Kejriwal: 'आम्हाला काँग्रेसमधला कचरा नकोय, नाहीतर...', अरविंद केजरीवालांनी केला मोठा गौप्यस्फोट

Arvind Kejriwal: 'आम्हाला काँग्रेसमधला कचरा नकोय, नाहीतर...', अरविंद केजरीवालांनी केला मोठा गौप्यस्फोट

Next

अमृतसर-

Arvind Kejriwal in Punjab: पंजाब दौऱ्यावर असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अमृतसरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी काँग्रेसचे आमदार आणि खासदारांबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. "आम्हाला आमच्या पक्षात काँग्रसमधला कचरा नकोय, नाहीतर आज संध्याकाळपर्यंत काँग्रेसचे २५ आमदार आणि दोन-तीन खासदार आम आदमी पक्षात दिसले असते", असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. 

"ज्या नेत्याला निवडणुकीचं तिकीट मिळत नाही तो पक्षावर नाराज होत असतो आणि हे प्रत्येक पक्षात होत असते. त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले जातात. काही जण तयार होतात आणि काहींची मनधरणी करण्यात यश येत नाहीत. असे लोक दुसऱ्या पक्षात जाण्याचा मार्ग स्वीकारतात. काँग्रेसमधले असे बरेच नेते आणि आमदार आमच्या संपर्कात आहेत. पण आम्हाला काँग्रेसमधला कचरा आमच्या पक्षात नकोय", असं रोखठोक वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. 

"आम्ही जर काँग्रेसमधला कचरा आमच्या पक्षात घेण्यास सुरुवात केली तर मी ठामपणे सांगू शकतो की आज संध्याकाळपर्यंत काँग्रेसचे २५ आमदार आमच्या पक्षात दिसले असते. तुम्हाला जर त्यांचे किती आणि आमचे किती अशी स्पर्धाच जर करायची आहे. तर आमचे तर दोनच आमदार तिथं गेलेत. पण त्यांचे २५ आमदार आणि दोन-तीन खासदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांना आमच्या पक्षात यायचं आहे. पण हे वाईट राजकारण आहे आणि यात आम्हाला पडायचं नाही", असं केजरीवाल म्हणाले. 

दरम्यान, पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आता कमकुवत झाला आहे. कारण पक्षाचे तीन पैकी दोन आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये गेले आहेत. भटिंडा ग्रामीण मतदार संघातील आमदार रुबी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर रायकोट मतदार संघाचे आमदार जगतार सिंग यांनी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचं कौतुक करत काँग्रेसचा मार्ग स्वीकारला आहे. 

Web Title: punjab assembly elections delhi cm arvind kejriwal attack congress garbage aam aadmi party aap punjab election 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.