शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

Punjab Assembly Election: पंजाबमध्ये सध्या काय स्थिती? कोणाचं पारडं जड? कोण कोणाला डोईजड?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 6:44 AM

काँग्रेस आणि आप यांच्यातच थेट लढत असून भाजप या ठिकाणी नगण्य आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी आढळून आल्याच्या मुद्द्यावरून भाजपशासित केंद्र सरकारने त्यावर मोठी आदळआपट केली. राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय इत्यादींपर्यंत प्रकरण नेण्यात आले. देशभरात रान माजविण्यात आले. या सर्व प्रकारामुळे हबकलेल्या काँग्रेसने नंतर हा तर पंजाबीयतचा अपमान असा पलटवार केला. विधानसभा निवडणुकीत हा मुद्दाच आता तापणार अशी चिन्हे आहेत. काँग्रेस आणि आप यांच्यातच थेट लढत असून भाजप या ठिकाणी नगण्य आहे.'कॅप्टन'ला मिळणार कर्णधारपद? कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी वेगळी चूल मांडल्याने काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना किती पाठबळ मिळते हे मतदारच ठरवतील.  केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द केल्याने शेतकरी आंदोलनाचा मुद्दा मागे पडला असल्याचा भाजपचा दावा आहे. त्यातच अमरिंदरसिंग आणि सुखविंदरसिंग धिंडसा (संयुक्त शिरोमणी अकाली दल) यांच्याशी हातमिळवणी केल्याने चांगल्या कामगिरीची भाजपला अपेक्षा आहे.चरणजीतसिंग चन्नी आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात कोणताही वाद नाही. ते एकदिलाने काम करत आहेत, हे दर्शविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. राज्यात असलेली सत्ता राखण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. त्यामुळे कमीतकमी बंडखोरी होईल आणि अधिकाधिक जागांवर उमेदवार विजयी होतील, यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे.शहरी मतदारांत आपविषयी आकर्षण असले तरी त्याचे मतांत कितपत रुपांतर होईल, हा प्रश्न आहे. मात्र, तरी थेट लढत काँग्रेस आणि आप यांच्यातच होणार आहे, हे नक्की.चर्चेतले चेहरे...नवज्योतसिंग सिद्धू : पंजाबातील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसमध्ये उडी मारणारे नवज्योतसिंग सिद्धू वाचाळवीर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या छबीचा पक्षाला फायदा होईल, म्हणून त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. तसेच कॅप्टन अमरिंदरसिंग यांना काटशह देण्यासाठी म्हणूनही सिद्धू यांचे प्यादे पुढे करण्यात आले. अमरिंदर यांनी नाराज होऊन पक्षालाच सोडचिठ्ठी दिली. आताही मुख्यमंत्री चन्नी यांना सिद्धू स्वस्थ बसू देत नसल्याचेच चित्र आहे.चरणजितसिंग चन्नी : कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसश्रेष्ठींनी चरणजितसिंग चन्नी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवली. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत त्रुटी निर्माण झाल्याच्या मुद्द्यावरून चन्नी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले असले तरी सुरुवातीला बॅकफूटला गेलेल्या चन्नी यांनी नंतर टीकाकारांना सडेतोड प्रश्न विचारले. त्यामुळे त्यांचे प्रतिमासंवर्धन झाले असले तरी पक्षाला त्याचा कितपत फायदा होतो, हे पहावे लागेल.सुखबीरसिंग बादल : शिरोमणी अकाली दलाचे नेते असलेल्या बादल यांना ही निवडणूक भाजपच्या मदतीशिवाय लढवायची आहे. पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचविण्यासाठी बादल यांना राज्य पिंजून काढावे लागणार आहे. रोड शो आणि नुक्कड सभा यांच्या माध्यमातून बादल यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.भगवंत मान : आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील विधानसभा निवडणुकांसाठी भगवंत मान यांची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. भगवंत मान हे आम आदमी पक्षाचे संग्रुर लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. 'पंजाब दा मान, सरदार भगवंत मान' असा प्रचार आता त्यांनी सुरू केला आहे. 

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेसAAPआपBJPभाजपाShiromani Akali Dalशिरोमणी अकाली दल