शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

Punjab Assembly Election 2022: करिअर कुणाचं संपणार मजिठिया यांचं की सिद्धूंचं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 10:47 IST

Punjab Assembly Election 2022: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी मजिठिया यांना आपल्याविरोधात अमृतसरमधून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले हाेते. मजिठिया यांनी फक्त आव्हान स्वीकारले असे नाही, तर त्यांचा परंपरागत मतदारसंघ मजिठातून उमेदवारी अर्ज भरला नाही. आता करिअर कोणाचे संपणार मजिठिया की सिद्धू यांचे?

करिअर पणाला पंजाबमध्ये विक्रम सिंह मजिठिया यांचे नाव बहुतांश वेळा अमली पदार्थांच्या धंद्याशी जोडले गेलेले आहे. ते अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांचे मेहुणे आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी मजिठिया यांना आपल्याविरोधात अमृतसरमधून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले हाेते. मजिठिया यांनी फक्त आव्हान स्वीकारले असे नाही, तर त्यांचा परंपरागत मतदारसंघ मजिठातून उमेदवारी अर्ज भरला नाही. आता करिअर कोणाचे संपणार मजिठिया की सिद्धू यांचे? 

मांजरांच्या भांडणातलखनौतील सरोजिनीनगर मतदारसंघात गेल्या निवडणुकीत महिला शक्तीचे प्रतीक बनून स्वाती सिंह विजयी झाल्या होत्या. त्यांना योगी मंत्रिमंडळात महिला आणि बालविकास मंत्रिपद दिले गेले होते; परंतु या निवडणुकीत या जागेवर त्यांचे पती आणि  भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी दावा केला होता. पती-पत्नीचे नाते इतके बिघडले होते की, त्यांचे अनेक कॉल रेकॉर्डिंग काही दिवसांपूर्वी व्हायरल झाल्या होत्या. पक्षाने पती- पत्नीतील वाद स्वत: मिटविण्याचा सल्ला देत तिकीट राजेश्वर यांना दिले. तसे राजेश्वर यांचा मार्गही सोपा नाही. त्यांच्याविरोधात समाजवादी पार्टीने माजी मंत्री आणि अखिलेश यादव यांचे निकटवर्ती अभिषेक मिश्रा यांना उमेदवारी दिली. अभिषेक मिश्रा यांचे वडीलही आयएएस होते. अभिषेक आयआयएममध्ये (अहमदाबाद) प्रोफेसर होते.

महिला शक्तीचे प्रतीकगेल्या निवडणुकीत बसपचे नेते नसिमुद्दीन सिद्दीकी यांच्याविरोधात लढून स्वाती सिंह महिला शक्तीच्या प्रतीक बनल्या होत्या. यावेळी काँग्रेसने नेहा तिवारी यांना कानपूरच्या कल्याणपूर मतदारसंघातून तिकीट दिले आहे. तिवारी यांची बहीण खुशी दुबे यांचे लग्न अमर दुबे यांच्याशी झाले होते. तो लग्नानंतर दोन दिवसांत बिकरू कांडमध्ये विकास दुबेसोबत पोलिसांकडून मारला गेला. तेव्हापासून खुशी दुबे तुरुंगात आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण स्वाभिमानच्या प्रतीक बनल्या आहेत. प्रियांका गांधी म्हणतात की, जिचे दोन दिवसांपूर्वी लग्न झाले तिला गुन्हेगारी कटात अटक कशी केली जाऊ शकते? त्यांनी आधी खुशी यांची आई गायत्री दुबे यांना तिकीट दिले होते. गेल्या पाच निवडणुकांपासून सतत मतदान करीत असलेल्या गायत्री यांचे नाव शेवटच्या क्षणी मतदार यादीत नव्हते म्हणून नेहा तिवारी यांना मैदानात उतरवले गेले.

पक्ष नाराजसाधूला कोणतीच जात नसते; परंतु उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी क्षत्रिय कुळात जन्म मिळाल्यामुळे स्वत:चा गौरव झाल्याचे वाटत असल्याचे नुकतेच म्हटले. गेल्या पाच वर्षांपासून त्यांच्यावर ठाकुरांवर कृपा करीत असल्याचे आणि ब्राह्मणांविरोधात असल्याचे आरोप होत आले आहेत. ते या वक्तव्यामुळे खरे होत असल्याचे दिसते. याच कारणामुळे पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज आहेत. 

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूcongressकाँग्रेस