शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

एखाद्याच्या प्रेमात पडल्याबद्दल त्याला शिक्षा देणं हा गुन्हा; सुप्रीम कोर्टाचं स्पष्ट मत

By मोरेश्वर येरम | Updated: January 7, 2021 14:15 IST

एका खटल्याचा निकाल देताना सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी काही महत्वपूर्ण निरीक्षणं नोंदवली आहेत.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशातील एका गावात घडली होती गंभीर घटनाप्रेमी युगुलांना गावच्या खाप पंचायतीनं प्रेम केल्याबद्दल दिली होती फाशीची शिक्षासुप्रीम कोर्टाने सर्व आरोपींना खडेबोल सुनावले

नवी दिल्लीएखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्यामुळे किंवा एकमेकांचा सहवास लाभण्याची इच्छा व्यक्त केल्याबद्दल त्यांना शिक्षा देणं हा कायद्यानं गुन्हा आहे, असं स्पष्ट मत सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलं आहे.

एका खटल्याचा निकाल देताना सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी काही महत्वपूर्ण निरीक्षणं नोंदवली आहेत. "तुम्ही एखाद्याला प्रेमात पडल्याबद्दल शिक्षा करू शकत नाही", असं शरद बोबडे म्हणाले. तशी शिक्षा केल्यास तो गंभीर स्वरुपाचा गुन्हा ठरेल, असंही ते पुढे म्हणाले. 

सुप्रीम कोर्टाच्या तीन सदस्यीय घटनापीठासमोर आज एका गावातील खाप पंचायतीमधील ११ सदस्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी झाली. एका गावातील एक दलित तरुण तरुणीसोबत पळून गेला होता आणि त्यांना पळून जाण्यास तरुणाच्या चुलतभावाने मदत केली होती. या तिघांनाही फाशी देण्याचा धक्कादायक प्रकार गावातील पंचायत सदस्यांनी केला होता. या प्रकरणावरील सुनावणीत न्यायाधीशांनी सर्व आरोपींना झापलं. 

पळून गेलेल्या तरुण आणि तरुणीने काही दिवसांनी गावात परतण्याचा निर्णय घेतला होता. गावकरी शांत झाले असतील असा त्यांचा समज होता. पण ते गावात परतल्यानंतर दोघांनाही मारहाण करण्यात आली. तर दोघांना मदत करणाऱ्या चुलत भावालाही गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यानंतर या तिघांनीही गावतीला एका झाडाला टांगून फाशी देण्यात आली होती. 

उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातील मेहराना गावात १९९१ साली ही घटना घडली होती. या प्रकरणात ११ जणांना अटक करण्यात आली होती. त्यातील ८ जणांना अलहाबाद कोर्टाने २०१६ साली फाशीची शिक्षा सुनावली. तर इतरांना आजीवन तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टUttar Pradeshउत्तर प्रदेश