शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
4
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
5
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
6
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
7
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
8
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
9
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
10
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
11
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
12
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
13
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
14
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
15
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
16
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
17
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
18
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
19
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
20
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश

जिद्दीला सलाम! दृष्टीहीन असूनही पुण्याचा मराठमोळा जयंत मंकले UPSC मध्ये देशात १४३ वा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 15:11 IST

कठोर मेहनत आणि परिश्रमांनंतर जयंतनं अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत देशभरातून ८२९ तरूण तरूणींची निवड करण्यात आली आहे. UPSC परीक्षेत प्रदीप सिंह यांनी देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर  दुसऱ्या स्थानी जतिन किशोर आणि तिसऱ्या क्रमांकावर प्रतिभा वर्मा यांनी यश मिळविले आहे. यूपीएससी सिव्हिल सर्विस परीक्षेच्या मुलाखती २० जुलैला सुरु झाल्या होत्या. या परीक्षांचा निकाल मंगळवारी सकाळी जाहीर करण्यात आला. कोरोनामुळे या मुलाखत प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. 

या सगळ्या गुणवंत आणि महत्वाकांक्षी विद्यार्थ्यांमध्ये लक्षवेधी ठरलेला विद्यार्थी जयंत मंकले. जयंत मंकले पुण्याचा रहिवासी आहे. दृष्टीहीन असूनही या विद्यार्थ्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेत १४३ वा क्रमांक पटकावला आहे. याआधीही जयंत मंकले याने लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली होती. त्यावेळी जयंतचा ९३७ वा क्रमांक होता. नंतर दोन वर्ष जिद्दीने अभ्यास करून जयंतने पुन्हा परिक्षा दिली. आधीच्या परिक्षेत यश न मिळाल्यामुळे जयंतला नैराश्य आले होते. पण त्यानंतर पुन्हा परिक्षा देऊन या अंध विद्यार्थ्यानं घवघवीत यश मिळवलं आहे.

संगमनेरच्या अमृतवाहिनी महाविद्यालयातून २०१३ ला प्रथम श्रेणीतून जयंतने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर तळेगाव दाभाडे व भोसरी येथे दोन वर्षे मेंटेनन्स इंजिनिअर म्हणून नोकरी केली. याच दरम्यान जयंतला 'रेटिना पिग्मेन्टोसा' हा डोळ्यांचा आजार उद्भवला. परिणामी डोळ्यांना कमी दिसून लागले. जयंतला सुरूवातीपासूनच लोकसेवा आयोगाची परिक्षा द्यायची होती. मात्र IES मध्ये दिव्यांगांना प्रवेश नसतो. पण आपलं  शिक्षण सार्थकी लागण्यासाठी ही परिक्षा देण्याचा निर्णय घेतला. कठोर मेहनत आणि परिश्रमांनंतर जयंतनं अभिमानास्पद कामगिरी केली आहे. राज्यभरातून या विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बाबो! ऑफिस मीटिंगमध्ये व्यक्तीच्या फोनवर आला मेसेज, उघडताच ३० सेकंदात संपलं पूर्ण करिअर

बोंबला! मजेसाठी 'त्याने' प्रायव्हेट पार्टमध्ये टाकले असे काही, सीटी स्कॅन पाहून डॉक्टरही झाले हैराण.....

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगPuneपुणे