शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

Pulwama Attack: हल्लेखोराला दोन वर्षात सहावेळा झाली होती अटक; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 16:39 IST

दहशतवाद्यांना मदत, दगडफेकीच्या आरोपाखाली आदिल अहमद दारला अटक झाली होती

श्रीनगर: पुलवामात सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याला सहावेळा अटक करण्यात आली होती, अशी माहिती समोर येत आहे. सप्टेंबर 2016 ते मार्च 2018 या कालावधीत दहशतवादी आदिल अहमद दारला सहावेळी अटक झाली होती. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाला मदत आणि दगडफेक प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. मात्र त्याच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यानं त्याला सोडून देण्यात आलं. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरामध्ये गुरुवारी सीआरपीएफच्या ताफ्यावर आदिल अहमद दारनं आत्मघाती हल्ला केला. आदिल पुलवामा जिल्ह्यातल्या गुंडीबाग जिल्ह्याचा रहिवासी होता. त्याला गेल्या दोन वर्षात सहावेळा अटक करण्यात आली होती, अशी माहिती गुप्तचर विभाग आणि पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी दिली. आदिलवर सुरक्षा यंत्रणांनी नजर ठेवण्याची गरज होती, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे गुप्तचर विभागाचा हलगर्जीपणा 40 जवानांच्या जीवावर बेतला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आदिल अहमद दारविरोधात कधीही एफआयआर दाखल करण्यात आला नाही, अशी माहिती आयबी आणि पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी दिली. आदिल 2016 पासून दहशतवादी कारवाया करत होता. दहशतवाद्यांना लपवण्याचं काम आदिल करायचा. दहशतवादी संघटनेचं कमांडर आणि या संघटनांकडे आकर्षित होणारे तरुण यांच्यातला मध्यस्थ म्हणून तो काम पाहत होता. आदिलच्या कुटुंबातील काहींचे दहशतवाद्यांचे संबंध असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 'जैश-ए-मोहम्मदमध्ये सहभागी होण्यापूर्वी सुरक्षा दलांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी आदिलला दोनवेळा अटक करण्यात आली होती. याशिवाय दहशतवाद्यांना सहकार्य केल्याच्या आरोपाखाली त्याला 4 वेळा अटक करण्यात आली होती,' असंदेखील अधिकाऱ्यांनी सांगितलं.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरJaish e Mohammadजैश ए मोहम्मदLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबाPakistanपाकिस्तान