शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Pulwama Attack: ...तर अनर्थ घडलाच नसता; वाचले असते जवानांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 20:01 IST

काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा मोठा हल्ला

श्रीनगर: काश्मीरच्या पुलवामात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात 30 जवान शहीद झाले आहेत. जवानांना घेऊन जाणाऱ्या ताफ्यातील बसला अवंतीपुरामध्ये दहशतवाद्यांच्या वाहनानं धडक दिली. या वाहनात जवळपास 200 किलो स्फोटकं होती. गुप्तचर यंत्रणांनी सात दिवस आधीच याबद्दलचा अलर्ट जारी केला होता. काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला होऊ शकतो, जवानांच्या ताफ्यावर आयईडीच्या मदतीनं पुलवामात दहशतवादी हल्ला करु शकतात, असा अलर्ट देण्यात आला होता. संसदेवरील हल्ल्याचा दोषी अफजल गुरुच्या फाशीला सहा वर्षे पूर्ण होत असल्यानं दहशतवाद्यांकडून हल्ला घडवला जाऊ शकतो. त्यामुळे सतर्क राहण्याच्या सूचना गुप्तचर विभागानं दिल्या होत्या. याशिवाय जेकेएलएफचा संस्थापक मोहम्मद मकबूल भट्टच्या फाशीला 35 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हल्ला घडवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. 8 फेब्रुवारीला याबद्दलचा अलर्ट जारी करण्यात आला होता. दहशतवाद्यांनी हल्ल्याची संपूर्ण योजना आखल्याची माहिती यामधून देण्यात आली होती. सीआरपीएफच्या किंवा पोलिसांच्या तळांवर दहशतवादी मोठा हल्ला घडवू शकतात, असा स्पष्ट अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे सतर्क राहण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या होत्या. ज्या भागात सुरक्षेसाठी जात आहात, तिथल्या परिस्थितीचा आधी संपूर्ण आढावा घ्या, असं अलर्टमध्ये सांगण्यात आलं होतं. मात्र तरीही सुरक्षा दलांकडून चूक झाली आणि दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्यासाठी रस्त्याच्या शेजारी असलेल्या एका गाडीत स्फोटकांचा साठा ठेवला होता. सीआरपीएफचा ताफा या रस्त्यावरुन जाऊ लागताच ही गाडी त्या ताफ्यावर जाऊन धडकली आणि मोठा स्फोट झाला. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्ला