शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पुलवामासारखा हल्ला उधळला, ५२ किलो स्फोटके जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 03:32 IST

मागील वर्षी १४ फेब्रुवारी रोजी पुलवामामध्ये स्फोटकांनी भरलेली कार अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या वाहन ताफ्यावर धडकवली होती. त्यात ४० जवान शहीद झाले होते.

नवी दिल्ली : पुलवामासारखा हल्ला करण्याचा कट भारतीय लष्कराने उधळला असून, गुरूवारी ५२ किलो स्फोटके जप्त केली आहेत. काश्मीरच्या करेवा भागातून ही स्फोटके जप्त करण्यात आली. ज्या ठिकाणी पुलवामा हल्ला झाला होता, त्यापासून आज स्फोटके सापडलेले ठिकाण केवळ ९ किलोमीटर अंतरावर आहे.लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही पुलवामासारखा दुसरा हल्ला उधळून लावला आहे. पाण्याच्या एका टाकीमध्ये ही स्फोटके दडवून ठेवलेली होती. गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या झडतीमध्ये ती आढळली. यावेळी स्फोटकांची एकूण ४१६ पाकिटे सापडली. प्रत्येक पाकीट १२५ ग्रॅमचे आहे. त्याचबरोबर ५० डिटोनेटर्स अन्य एका टाकीत सापडले. ही स्फोटके सुपर-९० किंवा एस-९० या नावाने ओळखली जातात.मागील वर्षी १४ फेब्रुवारी रोजी पुलवामामध्ये स्फोटकांनी भरलेली कार अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या वाहन ताफ्यावर धडकवली होती. त्यात ४० जवान शहीद झाले होते. पाकिस्तानस्थित जैश या अतिरेकी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या हल्ल्याच्या १२ दिवसांनंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून जैशचे प्रशिक्षण अड्डे उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर दोन्ही देशांत कमालीचा तणाव निर्माण झाला. मागील महिन्यात एनआयएने आरोपपत्र दाखल करून या हल्ल्याचा कट कसा रचला गेला, याचा पर्दाफाश केला होता.एनआयएने केला होता पर्दाफाशपाकिस्तानस्थित जैश या अतिरेकी संघटनेने पुलवामा येथील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.मागील महिन्यात एनआयएने आरोपपत्र दाखल करून जैशने केलेल्या या हल्ल्याचा कट कसा रचला गेला, याचा पर्दाफाश केला होता.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला