शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही केली की खुद्दारी, दुसऱ्यानं केली तर गद्दारी; सिद्धूंचा मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 18:29 IST

चार फोटो ट्विट करत सिद्धू मोदींवर बरसले

नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याबद्दल केलेल्या विधानामुळे काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू अडचणीत सापडले. भाजपानं सिद्धू यांच्यावर सडकून टीका केली. आता या टीकेला सिद्धूंनी थेट प्रत्युत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे सिद्धू यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तुम्ही केली की खुद्दारी, दुसऱ्यानं केली तर गद्दारी, अशा शब्दांमध्ये सिद्धूंनी मोदी आणि भाजपाला लक्ष्य केलं. या ट्विटमध्ये त्यांनी चार फोटो जोडले आहेत. यात त्यांनी मोदींना टॅगदेखील केलं आहे. तुमच्या भाड्याच्या ट्रोल्सना घाबरत नाही, असं सिद्धूंनी म्हटलं आहे. 'पीएम साहब आप का डायलॉग खुद्दारी, किसी और का डायलॉग गद्दारी, सत्य पड़ेगा तुमपे भारी', असं नवजोत सिंग सिद्धूंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटमध्ये नरेंद्र मोदी यांचे दोन फोटो वापरण्यात आले आहेत. यातील एक फोटो इम्रान खान यांच्यासोबतचा आहेत. तर दुसऱ्या फोटोत मोदी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासोबत दिसत आहेत. 25 डिसेंबर 2015 रोजी मोदी अचानक लाहोरला गेले होते. त्यावेळी काढण्यात आलेला फोटो सिद्धू यांनी ट्विट केला आहे. दुसऱ्या फोटोत सिद्धू यांनी वर्तमानपत्रातील दोन बातम्यांची कात्रणं शेअर केली आहे. भारत, सौदी अरेबिया पाकिस्तानसोबत अनुकूल वातावरणात चर्चा करणार, सौदीकडून दहशतवादाला निषेध; पण पाकिस्तानबद्दल मौन अशा दोन बातम्या त्यांनी ट्विट केल्या आहेत. तिसऱ्या फोटोत केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत दिसत आहेत. कौर अकाली दलाच्या नेत्या आहेत. अकाली दल भाजपाचा मित्रपक्ष आहे. तर चौथा फोटो जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरच्या सुटकेशी संबंधित आहे. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना कंदाहार विमान अपघात प्रकरण घडलं. त्यावेळी वाजपेयी सरकारनं अजहरची सुटका केली होती. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाNarendra Modiनरेंद्र मोदीNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धू