शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सभा घेऊन कोणाचे पोर कडेवर खेळवणार? अनिल परबांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण
2
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
3
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
4
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
6
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
7
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
8
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
9
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
10
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
11
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
12
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
13
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
14
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
15
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
16
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
17
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
18
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
19
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
20
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?

Pulwama Attack : उत्तर तर नक्की द्यायचं आहे पण कसं ? तुम्हालाही पटेल 'मोसाद'चा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 6:22 AM

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या.

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या. अवघ्या दोन दिवसांत पत्रांचा अक्षरक्ष: पाऊस पडला. यावरूनच देशवासीयांच्या तीव्र भावनांची कल्पना येते. या अमानवी हल्ल्याबाबत दु:ख व्यक्त करतानाच लोकांनी आपल्या मनातील संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. अनेक जणांनी पाकिस्तानचा बदला घ्या, दहशतवाद्यांना ठेचून काढा, असे म्हटले आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक कोंडी करून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा पाडावा, असे काहींना वाटते. महत्त्वाचे म्हणजे, शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम उभे असल्याची ग्वाही देताना, तेथे कर माझे जुळती... ही भावना सर्वांचीच आहे!१४ फेबरुवारीला पुलवामा येथे झालेल्या भ्याड आतंकवादी हल्यात आपल्या देशाचे किमान ४० जवान शहीद झाले. त्यानंतर देशातील जनतेत आक्रोश पसरला आहे जनतेची मागणी ही की आत्ताच्या आत्ता तत्काळ पाकिस्तानला प्रत्युत्तर द्या.उत्तर तर नक्की द्यायचं आहे पण कसं ?उरी -२ स्टाईल ने ? का अस असेल, जे असेल पण दिसणार नाही, जे मारेल पण भणकही लागणार नाही आणि ज्याच्यामुळे आतंकवादी आपल्या देशाकडे पाहण्याची हिम्मत ही करणार नाहीत ! आहे का असा कोणता मार्ग ? दहशतवाद्यांचा बीमोड कण्यासाठी ?हो.. आहे एक मार्ग आहे , अवघड आहे, महागडा आहे .तो म्हणजे ' मोसाद ' चा मार्ग     म्युनिक १९७२ , पॅलेस्टिनी आतंकवादी संघटनेने सप्टेंबरमध्ये ११ इस्रायली ओलंपिक खेळाडूंचं अपहरण करुन हत्या केली ह्याचा बदला घेण्यासाठी मोसाद ने सुरू केले ऑपरेशन ' वॉर्थ ऑफ गॉड' एक एक तो आतंकवादी ज्याचा ह्या कांडात सहभाग होता त्याची ओळख पटवली मग त्याचा मागमूस काढला आणि ते ज्या देशात लपले होते त्या देशात घुसून मारलं. काय आपल्या देशात आहे का बळ पाकिस्तानात घुसून मसूद अजहर ला ठोकायच?

ज्या वेळेस एअर फ्रान्स च विमान आतंकवाद्यांनी अपहरण केलं आणि जवळ जवळ १०० इस्रायली नागरिकांना मारण्याची धमकी देवून आपले ४० साथीदार इस्रायली जेल मधुन सोडण्याची मागणी केली त्या वेळेस मोसाद ने सैन्याबरोबर संयुक्त ऑपरेशन राबवून ४००० की.मी युगांडा पर्यंतचा प्रवास करुन सगळ्या नागरिकांना सुरक्षित वापस आणलं. जर आपल्या जवळ मोसाद सारखं सटीक हत्यार असतं , असं इंटेलिजन्स असतं तर आपण १९९९ ला मौलाना मसूद अजहर च हस्तांतर नकर्ता नागरिकांना सुरक्षित वापस आणलं असतं , पण आज ह्याच मसूद आपले ४० पेक्षा जास्त जवान शहीद झाले

काय मोसाद सारखी गुप्तचर यंत्रणा भारतात शक्य आहे का ? हो नक्कीच फक्त गरज आहे ती पॉलिटिकल विल ची , अशा ऑपरेशनला इलेक्शन आणि व्होट या नजरेनं न पाहण्याची.

 नक्कीच एक उत्कृष्ट गुप्तचर यंत्रणा भारतातील दहशतवाद्यांचा बीमोड करू शकेल-------------------------------------------------------------------------------------------------------

काश्मीर मधिल बहुसंख्य लोक मुस्लिम असल्याने तेथील लोक व पर्यायाने तेथील भूभाग हा पाकिस्तानचा असल्याचा धार्मिक झुंडशहिचा युक्तिवाद पाकिस्तान करत आहे.(मुळात पाकचा जन्मही याच विचारसरणीतुन झाला आहे) सरळ लढाईत आपला निभाव लागणार नाही हे समजल्यावर आपला "विस्तारवादी हटवाद" आतंकवादाला खतपाणी घालून पाक साध्य करत आहे.हा हटवाद निचतेच्या कोणत्याही पातळीवर जाऊन पूर्ण करायचा . त्यासाठी शेकड़ोंचा नरसंहार का करावा लागेना ;त्यास धर्मयुद्ध म्हणून आपल्या निचकर्माचि पाठराखन ते हरामखोर करतात.     तेव्हा अश्या नरसंहरी कृत्यात भाग घेणाऱ्या निर्दयी मानसिकतेच्या लोकांना भयावह मृत्युदंडच दिल्या गेला पाहिजे.जेनेकरुन एक दरारा आतंकीच्या मनात होईल.हेच श्रीलंकेन LTTE चे उच्चाटन करताना केल.अमेरिकेन अफगान शी केल .दुसऱ्या महायुद्धात जपान, जर्मनीलाही अशीच अद्दल घड़वन्यात आली. पण कालांतराने झुंड़शाहीने पछाड़लेल्या जनमानसाच निरंतर वैचारिक समुपदेशन करने गरजेच जेनेकरुन आतंकवाद पुनः जन्म घेणार नाही व चिरकाल शांततेचि शक्यता निर्माण होईल.

नाव- कपिल राऊत (7709384880)पत्ता- नेहरू पार्कमध्ये , गणेशपुर रोड ,        शिवनेरी चौक . तालुका - वणी        यवतमाळ जिल्हा

-------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रथम शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली....

14 फेब्रुवारी 19 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपले जवान शहीद झालेत,पाकने केलेला हा भ्याड हल्ला आहे,पाकने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे कीं , ते किती विश्वासघातकी आहेत,या हल्ल्यामुळे दहशतवादी खूप खुश असतील पण त्यांनी जो हल्ला केलाय आणि जे 40 जवान शाहिद झालेत ते 1 जवान 100 च्या बरोबर होते,आणि पाकिस्तान तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही आमच्या 40 जवानांचा बळी घेतला याचा बदला आम्ही नक्की घेऊ,1)पाक दहशतवाद संपवण्यासाठी कुठल्याही पाकिस्तान मधील जनतेला जगात कुठेही जाण्याची परवानगी नसावी..2)सर्व देशानी एकत्र येऊन पाक वर हल्ला केला पाहिजे...(तेथील राहिवासीना त्रास न होता)3) सर्व अंतरराष्ट्रीय व्यवहार बंद करावेत...4)पाक ला मदत करणाऱ्या देशांना हि वाळीत टाकावे...5)अशी काही यंत्रणा शोधावी कि ज्या मध्ये समजेल दारुगोळा साठा कुठे लपवून ठेवलाय,दहशतवादी कुठे आहेत, इत्यादी माहिती मिळू शकेल...6)दहशतवाद संपवण्यासाठी सर्व जनतेने एकत्र येऊन याचा सामना केला पाहिजे...7)सरकार ला विनंती आहे कि, या दहशतवादी लढाई मध्ये आम्हा तरुणांना लढन्याची संधी द्या मग जीव गेला तरी बेहत्तर....पण दहशतवादी आणि दहशतवाद संपला पाहिजे...8)पुन्हा एकदा Surgical Strike गरज आहे आत्ता....

नाव - सुमित पांडुरंग धार्मिकपत्ता - एन 41 सी ई 1-8-16शिवशक्ती चौक , नविन नासिक,       नासिक-422008मोबाईल - 9850859577-----------------------------------------------------------------------------प्रगतशील देशातील आणि दहशतवादाला खत पाणी घालणाऱ्या देशातील नेत्यांचे खरोखर स्वताच्या देशावर किंवा धर्मावर  प्रेम असेल तर दहशतवादाची समस्या अस्तित्वातच राहणार नाही पण प्रेम जर राजसत्तेवर, स्वार्थावर असेल तर दहशतवादाचा बिमोड करण अशक्य आहे. दहशतवाद हि एकट्या भारताची समस्या नाही तर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारी आणि शांततेने राहणारी सर्व राष्ट्रांची समस्या आहे. स्वतःची प्रगती करण्यासाठी असमर्थ आणि असक्षम असणाऱ्या अज्ञानी राष्ट्राला ह्या राष्ट्रांची प्रगती पाहवत नाही. म्हणून काही राष्ट्र दहशतवादाला खतपाणी घालतात. दहशतवादाच मुळ कारण हे दहशतवाद्यांच अज्ञान आणि बेरोजगारी हे आहे. प्रगतशील राष्ट्रांनी एकत्र येऊन हे दूर करण्यासाठी ह्या भरकटलेल्या राष्ट्राला सहकार्य करण्याची तयारी दाखवून आपण परस्परावलंबनाने कशी प्रगती करू शकतो हे पटवून द्यावे परंतु त्याच बरोबर कुठलाही अतिरेकी हल्ला अशा राष्ट्राकडून झाला तर त्याचे चोख प्रत्युत्तर द्यावे. तीक्ष्णबुद्धी असणारे गुप्तहेर वाढवावे, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संवेदनशील ठिकाणी नजर ठेवावी, शिवाजी  महाराज ह्यांच्या गानिमी काव्याप्रमाणे जीथ कुठ ह्यांची ठिकाण असतील ती उध्वस्त करावी. राष्ट्राप्रेमाने हा विषय हाताळायला हवा, राजकारण करून नाही.डॉ. प्रीतम दादाजी तोरवणे, ६७, विद्यानगर, साक्री तालुका –साक्री, जिल्हा-धुळे मोबाईल नंबर- ८२७५००७४९९   ---------------------------------------------------------------------------------

सध्या काश्मीरला झालेला हा प्रकार विकृतीच्या पलीकडचा आहे. दहशतवाद्यांनी आपल्या जवानांवर केलेला हा भ्याड हल्ला निश्चितच तळपायाची आग मस्तकात पोहोचवणारा आहे.  या विकृतीवरूनच आपल्याला पाकिस्तान नावाच्या त्या देशाचा विकास कितपत झालाय हे समजते. भारतातील अर्ध्यापेक्षा अधिक दहशतवादी कारवाया या पाकिस्तानच्या कुजलेल्या डोक्यातून निघालेल्या असतात. हि गोष्ट सिद्ध करायला कुठलाही पुरावा लागणार नाही कारण अगदी चौथी --पाचवीतले लहान मुलं पण हे सांगतील.  या दहशतवादी राक्षसांनी आता आपल्याच देशातील युवकांना भडकवायला सुरुवात केली आहे.  प्रथम: आपल्याला त्या गोष्टी टाळाव्या लागतील आणि त्या बाजूने सकारात्मक पाऊले उचलावी लागतील.  हे दहशतवादी सापडल्यावर यांची कोणीही बाजू घेता काम नये. साधा पाकीटमार सापडल्यावर त्याला धो धो धुणाऱ्या आपल्या देशात Human rights किंवा इतर कोणी दहशतवाद्यांची बाजू घेऊच कशी शकते, हि पण विचार करायला लावणारी गोष्ट आहे.  या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई तर व्हायलाच हवी पण ती इतकी कठोर हवी कि शंभूराजे आणि शिवरायांनी जशी परकीय सत्तांना धडकी भरवली होती त्याचप्रमाणे या कुत्र्यांना भारतीय संविधानाची धडकी भरायला हवी.  सध्याची स्थिती बघता दहशतवाद्यांना नरम वागणूक हि द्यायलाच नको.  त्यांना कठोरात कठोर शिक्षा हि द्यायलाच हवी ज्यामुळे इतर दहशतवाद्यांना हि संदेश पोहचेल कि भारतासोबत वाकड घेतल्याने काय परिणाम होतील ते. आणि सर्वांत महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या देशातील काही कुत्री कोरभर भाकरीसाठी त्या दहशतवाद्यांसमोर शेपूट हलवतात आणि त्यांना या कारवाया करायला मदत करतात अशा हलकट लोकांना तर मृत्युदंड न देता मरणयातना जाणवतील अशी शिक्षा द्यायला हवी. दहशतवादाचा बंदोबस्त करतानाच काश्मीर मधील दगडफेक करणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करायला हवा कारण,  त्यांचा बंदोबस्त केला तर बर्याच दहशतवादी कारवाया जागीच थांबतील.  भारतीय सैन्याला पूर्ण सूट देऊन दहशतवाद्यांना त्यांची खरी जागा कुठे आहे हे दाखवू द्यावे हि सरकारला विनंती.. दहशतवादी (यात अंतर्गत आणि बाह्य हे दोन्ही) सापडले कि त्यांना कडक कठोर आणि मनात धडकी भरेल असे शासन व्हायलाच हवे.. धन्यवाद.. लोकमत ने मला माझे मत मांडायची संधी दिली त्याबद्दल मनापासून लोकमत च्या टीम ला धन्यवाद.. ----------------------------------------------------- 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाMartyrशहीदTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरPalestineपॅलेस्टाइन