दाळीचा उद्योगही संकटात! आवक घटली : ६० पैकी ३० मिल बंद पडण्याच्या मार्गावर
By Admin | Updated: September 9, 2015 01:42 IST2015-09-09T01:42:34+5:302015-09-09T01:42:34+5:30
लातूर : देशात लातूरच्या तूर दाळीचा उद्योग प्रसिद्ध आहे़ मात्र यंदाच्या दुष्काळामुळे तूर, उडीद, मुग आणि हरभर्याची आवक घटल्याने ६० पैकी ३० मिल बंद पडण्याच्या मार्गावर आहेत़ त्यामुळे या मिलमध्ये हमाली व काम करणार्या कामगारांच्या मजुरीचा प्रश्न निर्माण झाला आहे़ हजार क्विंटलची क्षमता असलेल्या एका मिलकडे ५०० ते ६०० क्विंटलचीच आवक होत आहे़ परिणामी, या मिल बंद पडण्याच्या मार्गावर आहेत़ त्यातच पाणीकपात झाल्यामुळे हा उद्योग संकटात आला आहे़

दाळीचा उद्योगही संकटात! आवक घटली : ६० पैकी ३० मिल बंद पडण्याच्या मार्गावर
ल तूर : देशात लातूरच्या तूर दाळीचा उद्योग प्रसिद्ध आहे़ मात्र यंदाच्या दुष्काळामुळे तूर, उडीद, मुग आणि हरभर्याची आवक घटल्याने ६० पैकी ३० मिल बंद पडण्याच्या मार्गावर आहेत़ त्यामुळे या मिलमध्ये हमाली व काम करणार्या कामगारांच्या मजुरीचा प्रश्न निर्माण झाला आहे़ हजार क्विंटलची क्षमता असलेल्या एका मिलकडे ५०० ते ६०० क्विंटलचीच आवक होत आहे़ परिणामी, या मिल बंद पडण्याच्या मार्गावर आहेत़ त्यातच पाणीकपात झाल्यामुळे हा उद्योग संकटात आला आहे़ लातूर शहरातील जुन्या व नव्या एमआयडीसीत एकूण ६० दालमिल आहेत़ एका मिलमध्ये दहा ते बारा कामगार आणि पाच ते सहा हमालांना रोजगार आहे़ जवळपास ७२० कामगार आणि ३६० हमालांचे पोट या उद्योगावर आहे़ मात्र यंदा दुष्काळामुळे तूर, उडीद, मुग आणि हरभर्याची आवक घटलेली आहे़ लातूरच्या मार्केट यार्डात दिवसाकाठी ५०० क्विंटल तुरीची आवक आहे आणि मिल ६० आहेत़ एका मिलची हजार क्विंटल दाळ करण्याची क्षमता आहे़ परंतू आवकच नाही़ त्यामुळे ३० मिल बंद पडण्याच्या मार्गावर आहेत़ दोन पाळीमध्ये चलणार्या या मिल दिवसाला एक तासच चलत आहेत़ परिणामी, या मिलवर अवलंबून असणार्या कामगारांच्या मजुरीचा प्रश्न निर्माण झाला आहे़ मिल मालकांनी या मजुरांना सध्या कामावर ठेवले असले तरी भविष्यात त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊ शकतो़ यंदा शेतकर्यांनी नगदी पीक म्हणून सोयाबीनचा पेरा केला असला तरी तुर, उडीद, मुगाचाही पेरा बर्यापैकी केला होता़ पाच महिन्यात तुरीचे पीक येते़ परंतू पाऊस न झाल्यामुळे हे पीक वाया गेले असल्याने मिलकडे तूर येण्याची शक्यताच नाही़ त्यामुळे यंदा हा व्यवसाय अडचणीत आला असल्याचे दालमिल असोसिएशनचे उपाध्यक्ष बालाप्रसाद बिदादा यांनी सांगितले़ आवक नसल्याने पूर्ण क्षमतेने दालमिल चलू शकत नाहीत़़़लातूर जिल्ातील प्रत्येकी एका दालमिलकडे तूर ५०० ते ६००, मुग ४०० ते ५००, उडीद ३०० आणि हरभरा १००० क्विंटल अशी आवक आहे़ एवढ्या तुटपुंज्या आवकीवर पूर्ण क्षमतेने दालमिल चलू शकत नाहीत़ या दुष्काळामुळे शेतकरी, मिलमालक, हमाल, कामगार असे सर्वच अडचणीत सापडले आहेत़ हमालही माल येण्याची वाट पाहतात आणि कामगार काम नसल्यामुळे बसून राहतात, अशी स्थिती दाळ उद्योगाची झाली असल्याचे असोसिएशनचे उपाध्यक्ष बिदादा यांनी सांगितले़