शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

Pulwama Attack : युद्ध नको, ‘विंटर नीती’ अवलंबा, देशभर दु:ख, संताप अन् बदल्याची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 05:12 IST

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या.

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या. अवघ्या दोन दिवसांत पत्रांचा अक्षरक्ष: पाऊस पडला. यावरूनच देशवासीयांच्या तीव्र भावनांची कल्पना येते. या अमानवी हल्ल्याबाबत दु:ख व्यक्त करतानाच लोकांनी आपल्या मनातील संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. अनेक जणांनी पाकिस्तानचा बदला घ्या, दहशतवाद्यांना ठेचून काढा, असे म्हटले आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक कोंडी करून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा पाडावा, असे काहींना वाटते. महत्त्वाचे म्हणजे, शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम उभे असल्याची ग्वाही देताना, तेथे कर माझे जुळती... ही भावना सर्वांचीच आहे!युद्ध नको, ‘विंटर नीती’ अवलंबाकाश्मीर मिळविण्यासाठी दोन युद्धात हरूनही पाकिस्तानने प्रयत्न चालूच आहेत. पुलवामातील हल्ला हा त्याचाच भाग. दुसऱ्या युद्धात रशियाने ‘विंटर नीती’ अवलंबून जर्मन सैन्य अन्न पाण्यावाचून मारले आणि त्यांचा पराभव केला. पाकिस्तानची जगभरातून रसद बंद करुन निर्णायक घाव घालायचा. अशी रणनीती खेळण्याचा धूर्तपणा मोदींकडे आहे.- कमलाकर बडवे, ४९८, नारायण पेठ, पुणे.कठोर उपाययोजनांची गरजअमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने जशी कठोर पावले उचलली तशी भारतानेही उचलण्याची गरज आहे. दहशतवाद हा विषय सर्व जगासाठी चिंतेचा आहे. त्यामुळे भारताने निर्णायक पाऊल उचलल्यास जगभरातून निश्चितच पाठिंबा मिळेल.- माणिकराव गावीत, नवापूर - नंदुरबार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री.दबाव वाढवाभारताविरुद्धच्या दहशतवादाला पाकिस्तानची रसद आहे. त्यांना चीनदेखील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करते. युद्धाच्या पटलावर असे नेपथ्य असताना सर्व राजकीय पक्षांनी दबाव वाढविण्यासाठी अगोदर एकत्र आले पाहिजे. २४ तास सुरक्षा देणाºया सैनिकांकडून एखादी चूक होऊ शकते. नेहमी सर्जिकल स्ट्राईक करणेही योग्य नाही. नियोजन केल्यास आपण अतिरेक्यांना चपराक बसणारे उत्तर देऊ शकतो.- विजय नातू, निवृत्त ब्रिगेडीयर, चाळीसगाव, जि. जळगाव.पाकची आर्थिक कोंडी कराविरोधी पक्षात असताना ‘पाच के बदले पचास’ म्हणणारे सत्तेत आल्यावर मात्र अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी ठोस कृती करीत नाही. केवळ सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तान सुधारणार नाही त्याही पेक्षा मोठी कारवाई करावी लागेल. दहशतवाद्यांना मदत करणाºया पाकिस्तानसारख्या सर्वच देशांची आर्थिक कोंडी करावी.- श्याम बसप्पा ठाणेदार, दौंड, जि. पुणेधर्मप्रमुखांनी एकत्र यावेसर्व धर्मप्रमुखांनी एकत्र बसून दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी विचार करण्याची गरज आहे. कारण सध्याचा दहशतवाद हा धार्मिक आधारावर होत असल्याचे दिसते किंवा तसे धार्मिक आधाराचे वलय त्याला प्राप्त झालेले आहे. म्हणून मूठभर लोकांकडून होत असलेला हा दशतवाद रोखण्यासाठी धर्म प्रमुखांनीच पुढे यायला हवे.- डॉ. दत्ताराम देसाई, (समाजसेवक), सावईवेरे-फोंडा, गोवा

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाterroristदहशतवादीIndiaभारत